Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर ताज्या घडामोडी सुशांत हा कधीच डिप्रेशनमध्ये जाणारा व्यक्ती नव्हता – अंकिता

सुशांत हा कधीच डिप्रेशनमध्ये जाणारा व्यक्ती नव्हता – अंकिता

Mumbai
sushant and ankita

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी त्याची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने या सगळ्या विषयावर वक्तव्य केलं आहे.

अंकिताने एका मुलाखतीमध्ये तिने सुशांत संबंधी अनेक गोष्टींची माहिती दिली आहे. अंकिता म्हणाली सुशांतला डायरी लिहिण्याची सवय होती. तसेच तो या डायरीमध्ये त्याच्या पुढच्या पाच वर्षांचे प्लॅन लिहून ठेवत असे. सुशांत हा अतिशय साधा मुलगा होता. छोट्या गावातून आलेला. त्याने इंडस्ट्रीमध्ये चांगलं नाव कमावलेलं. तो कधीच डिप्रेशनमध्ये जाणारा व्यक्ती नव्हता. सुशांतच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्याला शेती करायची होती आणि त्याला सुशांतच्या शॉर्ट फिल्म देखील तयार करायच्या होत्या.

यापुढे बोलताना अंकिता म्हणाली, मी गेल्या चार वर्षांपासून सुशांतच्या संपर्कात नाहीये. मोठ्या बहिणीने एकदा मला सांगितले होते की ती आपल्या भावाला भेटायला जात आहे, आणि नंतर काहीतरी घडले आणि त्याने माघार घेतली. त्याच्या बहिणीने मला सांगितले की तिला वाटते की कोणीतरी त्याच्यावर दबाव आणत आहे. सुशांत कधीही आपल्या राणी दीदीच्या विरोधात गेला नाही.

यापूर्वी अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये तिने ‘सत्याचा विजय होतो’ असे म्हटले होते. अंकिताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या होत्या.


हे ही वाचा – Sushant Case Live Updates : मुंबई पोलीस लवकरच निष्कर्षावर पोहचतील – जयंत पाटील


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here