आणखीन एक नवी मालिका

Mumbai
saath de tu mala

पूर्वी बरं होतं, करार झाल्याप्रमाणे ठरलेले भाग प्रसारित करता येत होते; पण आता एखादी मालिका प्रेक्षकांना आवडली नाही तर लागलीच बंद करणे आता वाढलेले आहे. दुसरीकडे असेही झालेले आहे, की प्रेक्षक मालिका पहात आहेत म्हटल्यानंतर वर्षानुवर्षे ती चालू ठेवलेली आहे. या झटपट निर्णयामुळे प्रत्येक वाहिनीवर नवनवीन मालिका पहायला मिळतात. ‘साद दे तू मला’ ही आणखीन एक नवी मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे.

प्रियंका तेंडुलकर ही नव अभिनेत्री या मालिकेपासून कलेच्या प्रांतात पदार्पण करणार आहे. आशुतोष कुलकर्णी, सविता प्रभुणे, रोहन गुजर, प्रिया मराठे, पियुष रानडे यांचा यात कलाकार म्हणून सहभाग असणार आहे. स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतिश राजवाडे यांच्या निगरानीतून आलेली ही मालिका आहे. आपली स्वप्न पूर्ण करू पहाणार्‍या एका युवतीची ही गोष्ट आहे. तिला भविष्यात नामांकीत फॅशन डिझायनर होण्याची इच्छा आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here