घरमनोरंजन#MeToo : माझ्या शांत बसण्याला कमजोरी समजू नका - अनु मलिक

#MeToo : माझ्या शांत बसण्याला कमजोरी समजू नका – अनु मलिक

Subscribe

#MeToo मोहिमेअंतर्गत झालेल्या आरोपांवर अनु मलिक यांनी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिले आहे.

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनु मलिक यांनी #MeToo मोहिमेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक पत्र शेअर केले आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये पार्श्वगायिका श्वेता पंडीतने अनु मलिक यांच्यावर मीटू मोहिमेअंतर्गत आरोप केले होते. या आरोपांवर अनु मलिक आतापर्यांत काहीच बोलले नव्हते. मात्र, आता त्यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. या आरोपांमुळे आपल्याला प्रचंड मनस्ताप झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय या आरोपांनी आपले करियरही संपवल्याचे त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – ऐश्वर्यानंतर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली करिना कपूर!

- Advertisement -

नेमके काय म्हणाले अनु मलिक?

‘गेल्या वर्षांपासून माझ्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांवर इतके दिवस मी शांत राहिलो. मला वाटलं जे खरं आहे ते आपोआप समोर येईल. मात्र माझ्या शांत राहण्यालाच लोकांनी माझी कमजोरी समजली. जेव्हापासून माझ्यावर हे गंभीर आरोप केले गेले आहेत तेव्हापासून माझी प्रतिष्ठा, माझा आणि माझ्या परिवाराच्या मनावर फार वाईट परिणाम झाला. या आरोपांनी माझं करियर संपुष्टात आणलं आहे. या आरोपांमुळे मी स्वत:ला हेल्पलेस समजतो’, असे अनु मलिक म्हणाले.

- Advertisement -

‘आयुष्याच्या या टप्प्यावर अशा प्रकारचे आरोप होणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हे आरोप तेव्हाच का केले गेले नाहीत? आता जेव्हा मी टीव्हीवर पुन्हा आलो आणि टीन्ही हा एकमेव पैसे कमवण्याचे साधन झाले तेव्हाच का माझ्यावर अशाप्रकारचे आरोप केले जात आहे? मला दोन मुली आहेत. दोन मुलींचा वडील असल्या नात्याने मी अशाप्रकारचे कृत्य करण्याचा विचारही करु शकत नाही. शो सुरु असलाच पाहिजे, मात्र चेहऱ्यावरील हास्याच्या पलिकडे मला प्रचंड त्रास होत आहे. मला आता न्याय पाहिजे’, असे अनु मलिक म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -