Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग विरूष्काला बाळाचा पहिला फोटो पाहिलात का?

विरूष्काला बाळाचा पहिला फोटो पाहिलात का?

घरी आली नवी ऐंजल असे म्हणत काकाने आपल्या पुतणीचा फोटो शेअर केला आहे.

Related Story

- Advertisement -

सर्वांचे लाडके अनुष्का आणि विराटला काल कन्यारत्न प्राप्त झाले. विराटने ट्विट करून ही खूश खबर त्याच्या चाहत्यांना दिली. विराट कोहलीचा भाऊ विकास कोहली यानी घरी आलेल्या नव्या पाहुणीचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. विकास कोहलीने त्यांच्या सोशल मीडियावर आपल्या पुतणीचा पहिला वहिला फोटो शेअर केला आहे. घरी आली नवी ऐंजल असे म्हणत काकाने आपल्या पुतणीचा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Kohli (@vk0681)

- Advertisement -

या फोटोत विरूष्काच्या घरी आलेल्या नाजूक पाहुणेचे इवलेशे पाय दिसत आहेत. विरूष्काच्या छोट्या परिचा पहिला फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी शुभेच्छाचा पाऊस पाडला आहे. तर फोटोवर अनेक कमेंटचा पाऊस पडला आहे. सोमवारी दुपारी अनुष्काने एका गोड मुलीला जन्म दिला. त्यानंतर विरोटने ही खुशखबर दिली. आम्हाला ही गोष्ट सांगण्यासाठी खूप आनंद होत आहे की आमच्या छोट्या मुलीचा जन्म झाला आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छासाठी मनापासून आभार. अनुष्का आणि आमची दोघीही सुखरूप आहेत. आम्ही दोघेही भाग्यवान आहोत की आम्हाला आयुष्यातील हा चाप्टर अनुभवण्याची संधी मिळाली, अशी पोस्ट विराटने केली होती.

- Advertisement -

विरूष्काच्या नव्या बाळाची बातमी कळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आणि मित्रमंडमळी आणि नातेवाईकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. विरूष्काच्या मुलीच्या कालपासून सर्वत्र चर्चा केली जात आहे. मुलीचे नाव काय ठेवणार ते मुलगी कोणासारखी असेल? कोणासाठी दिसते? यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळत आहे.


हेही वाचा – बायकोचा राग घालवण्यासाठी शाहीदला हवेत ‘मसाला’ सिनेमे!

- Advertisement -