घरमनोरंजनअनुष्का बनणार 'नासा'ची वैज्ञानिक...

अनुष्का बनणार ‘नासा’ची वैज्ञानिक…

Subscribe

भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा, सध्या तिच्या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यातीलच एक सिनेमा आहे ‘झिरो’. शाहरुख खान आणि कॅटरीना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘झिरो’ या सिनेमात अनुष्काही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, झिरोच्या शूटिंगमध्ये व्यग्र असलेली अनुष्का लवकरच ‘नासा’मध्ये जाणार असल्याचे समजते आहे.

‘नासा’मध्ये ४५ दिवसांचा मुक्काम

- Advertisement -

अनुष्का शर्मा ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत जाणार, ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे तिचे चाहते काहीसे गोंधळले असतील. मात्र, अनुष्का तिथे अन्य कोणत्या कामासाठी नाही तर सिनेमाच्या शूटिंगसाठीच जाणार आहे. ‘झिरो’ सिनेमाच्या शूटिंगसाठी अनुष्का आणि शाहरुख दोघंही ‘नासा’मध्ये जाणार आहेत. अनुष्का या सिनेमात एका वैज्ञानिकाची भूमिका साकारते आहे. शूटिंगसाठी अनुष्का आणि शाहरुख एकूण ४५ दिवस नासामध्येच वास्तव्य करतील.

अनुष्काची ही पहिलीच वेळ..

- Advertisement -

एखाद्या सिनेमाच्या शूटिंगसाठी ‘नासा’मध्ये जाण्याची अनुष्का शर्माची ही पाहिलीच वेळ आहे. झिरो सिनेमातील तिचा सहकलाकार शाहरुख खान मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा ‘नासा’वारी करत आहे. याआधी ‘स्वदेस’ सिनेमासाठी शाहरुखने नासा संस्थेच्या आवारात शूटिंग केले आहे.

सिनेमात पाहुण्या कलाकारांची ‘गर्दी’

‘झिरो’ सिनेमामध्ये झळकणाऱ्या पाहुण्या कलाकारांची यादीही मोठी आहे. सलमान खान, करिश्मा कपूर, काजोल आणि आलिया भट्ट आदी कलाकार सिनेमात पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावणार आहेत. याशिवाय दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीही या चित्रपटात दिसणार आहेत.

अनुष्काचे आगामी सिनेमे

‘झिरो’ सिनेमासोबतच अनुष्का तिच्या अन्य काही प्रोजेक्ट्समध्येही व्यग्र आहे. त्यातही तिच्या २ आगामी सिनेमांची सध्या विशेष चर्चा आहे. त्यातील एक सिनेमा आहे ‘संजू’. संजय दत्तच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये अनुष्का एक महत्वाचे पात्र साकारत आहे. तर दुसरीकडे अनुष्का ‘सुईधागा’ या सिनेमात अभिनेता वरुण धवनसोबत लीड रोलमध्ये झळकणार आहे.


फोटो इंस्टाग्रामच्या सौजन्याने

दरम्यान अनुष्का, शाहरुख आणि कॅटरिना या तिघांचे चाहते ‘झिरो’ सिनेमाची आतुरतेने वाट पाहात असतील, यात शंकाच नाही. शाहरुख खान प्रथमच एका बुटक्या माणसाची भूमिका साकारत असल्याने, ‘झिरो’ सिनेमा अधिकच चर्चेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -