घरमनोरंजनVideo: भारतीय क्रिकेट टीम सोबत सेलिब्रेशन करताना दिसली अनुष्का

Video: भारतीय क्रिकेट टीम सोबत सेलिब्रेशन करताना दिसली अनुष्का

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. यापुढील सामना हा ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू विजयी झाल्यामुळे सेलिब्रेशन करत आहेत. नुकताच याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील दिसली आहे. सध्या अनुष्का ही भारतीय क्रिकेट टीमला पाठिंबा देण्यासाठी वेस्ट इंडिजला पोहचली आहे. हा बुमरॅंग व्हिडिओ के.एल. राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये के.एल. राहुल, रविचंद्रन अश्विन, मयांक अग्रवाल, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दिसत आहे.

View this post on Instagram

Endless blues ??

A post shared by KL Rahul? (@rahulkl) on

- Advertisement -

या व्हिडिओवर क्रिकेटर के.एल. राहुलच्या चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहे. कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजसमोर ४१९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र वेस्ट इंडिजने फक्त १०० धावा केल्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर हा संघाच्या या कामगिरीमुळे निराश झाला आहे.

- Advertisement -

अद्यापही अनुष्का शर्माकडे कोणताही नवीन प्रोजेक्ट नाही आहे. ‘झिरो’ या शेवटच्या चित्रपटात अनुष्का शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत दिसली होती. माहितीनुसार, अनुष्का शर्माचे प्रॉडक्शन हाऊस नेटफ्लिक्ससाठी सीरिज तयार करत आहे. अद्यापही याबाबत अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -