Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अनुष्काची सटकली, विराटबरोबरचा खासगी फोटो व्हायरल

अनुष्काची सटकली, विराटबरोबरचा खासगी फोटो व्हायरल

Related Story

- Advertisement -

लवकरच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आईबाबा होणार आहे. त्यामुळे सध्या अनुष्का पती विराटसोबत प्रेग्नेंसी पिरियड एन्जॉय करताना दिसत आहे. अनुष्काने यादरम्यानचे अनेक प्रोजेक्ट पूर्ण केले असून नुकतेच तिने दमदार फोटोशूट केले होते. बेबी बंपसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलचे व्हायरल झाले होते. अनुष्का नेहमी चाहत्यांसोबत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच तिने जिममध्ये ट्रेडमिलवर धावतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. पण सध्या अनुष्का एका प्रायव्हेट फोटोमुळे खूप भडकली आहे.

अनुष्काने फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘फोटोग्राफर्स आणि पब्लिकेशनला अनेक वेळा विनंती केल्यानंतरही आमच्या खासगी आयुष्यात दखल घेणे सुरुच आहे. आता हे सगळं थांबवा.’

- Advertisement -

दरम्यान विराट आणि अनुष्काचा जो प्रायव्हेट फोटो व्हायरल झाला, त्यामध्ये ते दोघे बाल्कनीत एकत्र बसलेले दिसत आहेत आणि आपला क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. यादरम्यान कोणतीतरी त्यांचा हा फोटो काढला. त्यानंतर तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पण यामुळे अनुष्का भडकली आणि हे सगळं थांबवा म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

- Advertisement -

सध्या या दिवसात अनुष्का शर्मा सतत क्लिनिक बाहेर दिसत आहे. काल रात्री अनुष्का आई-वडिलांचा घराबाहेर दिसली. माहितीनुसार, अनुष्का या महिन्यात आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.


हेही वाचा – Happy Birthday Bipasha Basu: बॉलिवूडचे Hot & Bold सेन्सेशन


 

- Advertisement -