घरमनोरंजन'या' चित्रपटासाठी अनुष्का शिकली पोळ्या बनवायला!

‘या’ चित्रपटासाठी अनुष्का शिकली पोळ्या बनवायला!

Subscribe

अनुष्का शर्मा आणि अभिनेता वरूण धवन सध्या 'सुई धागा'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतीच त्यांनी ‘इंडियाज् बेस्ट ड्रामेबाझ’ च्या मंचावर हजेरी लावली. यावेळी अनुष्काने तिच्याबद्दलचं एक सिक्रेट सगळ्यांबरोबर शेअर केलं.

सध्या अनुष्का शर्मा आणि अभिनेता वरुण धवन आपल्या आगामी ‘सुई-धागा’ या चित्रपटाच्या प्रसोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतीच त्यांनी झी टीव्हीवरील ‘इंडियाज् बेस्ट ड्रामेबाझ’ या रिअॅलिटी शोच्या मंचावर ‘सुई-धागा’च्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. यावेळी या दोघांनीही बच्चे कंपनीबरोबर धम्माल केली. त्याचबरोबर ‘सुई-धागा’च्या शुटिंगदरम्यानचे अनेक किस्सेही सांगितले. यावेळी बच्चे कंपनीने सादर केलेल्या धम्माल परफॉर्मन्सला अनुष्का-वरूणने मनमुराद दाद दिली.

अनुष्का बनली दुकानदार!

दिपाली बोरकर आणि हर्ष राज लकी यांच्या धम्माल विनोदी सादरीकरणानंतर अनुष्का आणि विराट यांना मंचावर बोलावण्यात आलं. यावेळी ‘सुई-धागा’च्या प्रमोशनच्या निमित्ताने या दोघांना लुंगी, स्वेटर, लंगोट अशा गोष्टी विकायला सांगितल्या. अनुष्काने या सगळ्या गोष्टी कार्यक्रमाचे परीक्षक ओमंग कुमार, विवेक ओबेरॉय आणि शांतनु महेश्वरीला विकल्या. यावेळी सेटवर मुलं अनुष्का आणि वरुणकडून ‘बढिया’ हे गाणंही शिकले.

- Advertisement -
Anushka Sharma and Varun Dhawan
सुई धागा प्रमोशन

म्हणून अनुष्का शिकली ‘पोळ्या’!

‘इंडियाज् बेस्ट ड्रामेबाझ’च्या मंचावर अनुष्काने तिच्याबद्दलचं एक गुपित सांगितलं. अनुष्का म्हणाली, मी माझ्या आयुष्यात कधीही चपाती बनवलेली नाही. पण केवळ ‘सुई-धागा’ चित्रपटासाठी मी पोळ्या बनवण्याचा प्रयत्न केला. ब्रेकमध्ये मी पोळपाट लाटणे घेऊन पोळ्या बनवण्याचा प्रयत्न करायचे. सुरुवातील अनेकजण विचारायचे तू दृष्यांमध्ये पोळी का बनवत नाही? मग मी हळूहळू प्रयत्न केला आणि सीनमध्ये स्वत: पोळ्या बनवायला लागले. ही धम्माल २३ सप्टेंबरला रात्री ९ वाजता झी टिव्हीवर पाहता येणार आहे. या शोमध्ये अनुष्का शर्मा आणि वरुण धवन या शोमधील मुलांसोबत धम्माल करताना दिसणार आहेत. यावेळी ‘सुई-धागा’ चित्रपटावरचं एक स्पेशल सादरीकरणही प्रेक्षकांना बघता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -