अनुष्का बॉलिवूड सोडणार?

अनुष्काच्या सिनेकरिअर विषयी अनेक चर्चांना उधाण आले असून अनुष्का बॉलिवूड विश्व सोडण्याच्या तयारीत असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

Mumbai

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. अनुष्का कोणताच नवा चित्रपट स्वीकारायला तयार नाही. झीरो चित्रपटानंतर अनुष्का चित्रपटसृष्टीतून गायबच झाली आहे. या चित्रपटानंतर अनुष्का ने कोणताच नवा चित्रपट साइन केला नाही. त्यामुळे अनुष्काच्या सिनेकरिअर विषयी अनेक चर्चांना उधाण आले असून अनुष्का बॉलिवूड विश्व सोडण्याच्या तयारीत असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

अभिनेत्री म्हणून अनुष्काचे काम कमी झाल्याचे दिसते. याशिवाय बॉलिवूडमध्ये होणारे इव्हेन्ट्‌स, पार्ट्या यामध्येही अनुष्काचा सहभाग दिसत नाही. अशातच विराट कोहलीच्या सांगण्यावरून अनुष्का अभिनय सोडणार आहे. अनुष्काने जास्तीत जास्त वेळ हा आपल्या कुटुंबासोबत घालवावा असे विराटला वाटते. त्यामुळे ती बॉलिवूड विश्वापासून लांब असल्याचे बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

Sun soaked and stoked ☀️💞 #throwback

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

काही दिवसांपुर्वी अनुष्का गरोदर असण्याची असल्याची चर्चा देखील रंगताना दिसत होत्या. मात्र स्वतः अनुष्काने या होत असलेल्या चर्चा फक्त अफवा असल्याचे सांगितले आहे. सध्या अनुष्काकडे कोणताही नवा चित्रपट असल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरीही ती शेखर कपूरच्या पानी आणि संजय लीला भन्साळींच्या एका चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.

अनुष्का आपल्या सिने करिअरमधून छोटासा ब्रेक घेत असल्याचेही बोलले जात आहे. तिला विराट आणि त्याच्या कुटुंबाला वेळ द्यायचा असल्याने अनुष्काने हा निर्णय घेतल्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.