केरळमध्ये एका भुकेल्या गर्भवती हत्तीणीचा फटक्यांनी भरलेले अननस खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. या फटाक्यांच्या स्फोटानंतर या हत्तीणीला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे हत्तीणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या अमानवीय घटनेचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या घटनेचा निषेध केला असून अनुष्का शर्मा, रणदीप हुड्डा यांनी हत्तीणीच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केरळ सरकारकडे केली आहे. तसेच श्रद्धा कपूर, वरूण धवन, आलिया भट्ट, दिशा पटाणी, टायगर श्रॉफ यांसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या.
काय आहे घटना
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. ही हत्तीणी भुकेने त्रस्त झाली होती. त्यामुळे ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. त्याच दरम्यान, काही स्थानिक लोकांनी तिला अननसाद्वारे फाटाके खायला घातले. भुकेने व्याकुळ झालेल्या हत्तीणीने लोकांवर विश्वास ठेवत ते अननस खाल्ले आणि थोड्याच वेळात तिच्या पोटात फटाके फुटले. यातच गर्भाशयात वाढणार्या मुलासह तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्याने ही वेदनादायक घटना सोशल मीडियावर पोस्ट केली आणि लगेचच त्या हत्तीणीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोक चांगलेच संतापले.
हेही वाचा –
माल्ल्याला भारतात आणण्यावरून नेटिझन्स पेटले, एक सो एक मीम्स व्हायरल!