घरमनोरंजनविराटला भावले अनुष्काचे लहानपणीचे फोटो!

विराटला भावले अनुष्काचे लहानपणीचे फोटो!

Subscribe

नेहमीप्रमाणेच तिचे हे फोटोसुद्धा विराट कोहलीला खूप आवडले आहेत. आणि म्हणूनच पत्नी अनुष्का शर्माच्या या फोटोंवर हृदयाच्या आकाराचे इमोजी पाठवत विराटने अनुष्कावरील प्रेम व्यक्त केले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही दिवसांपासून बॉलीवूडपासून दूर आहे. मात्र तरीही सोशल मीडियावर सतत फोटो, पोस्ट टाकत ती आपल्या चाहत्यांना नेहमीच अपडेट करत असते. नुकतेच अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लहानपणीचे फोटो शेअर केले आहेत. नेहमीप्रमाणेच तिचे हे फोटोसुद्धा विराट कोहलीला खूप आवडले आहेत. आणि म्हणूनच पत्नी अनुष्का शर्माच्या या फोटोंवर हृदयाच्या आकाराचे इमोजी पाठवत विराटने अनुष्कावरील प्रेम व्यक्त केले आहे.

View this post on Instagram

लिटिल मी

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

- Advertisement -

अभिनेत्री अनुष्का शर्माने शेअर केलेल्या एका फोटोत अनुष्काचा अगदी लहानपणीचा फोटो आहे. फोटोतील लहानग्या अनुष्काचे निरागस हास्य तिच्या चाहत्यांना नक्कीच प्रेमात पाडेल. अनुष्काने तिच्या लहानपणीचे आणखी दोन फोटो शेअर केले आहेत. पैकी एका फोटोमध्ये अनुष्काने फ्रॉक आणि स्वेटर घातले असून ती बेडवर बसले आहे. या फोटोला तिने लिटल मी म्हणून कॅप्शन दिली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री दिया मिर्झाला सुद्धा अनुष्काचा हो फोटो आवडला आहे. तिनेसुद्धा अनुष्काच्या फोटोला सो स्विट म्हणत हार्ट शेपच्या तीन इमोजी पाठवल्या आहेत.

View this post on Instagram

लिटिल मी

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

- Advertisement -

दरम्यान काल गुरुवारी दिल्लीच्या फिरोज शहा कोटला स्टेडिअमच्या नामांतर सोहळ्याला कर्णधार विराट कोहली सपत्नी हजर होता. या नामांतर कार्यक्रमात स्टेडिअमच्या एका पॅव्हिलिअनला विराट कोहलीचे नाव देण्यात आले आहे. यावेळी अनुष्का आणि विराट हातात हात घेतल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

लिटिल मी

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहली सोबतच्या एका समुद्रकिनाऱ्यावरील व्हेकेशनचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे सध्या अनुष्का आणि विराटच्या त्या फोटोंवर भन्नाट मीम्स् व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – विरुष्काच्या ‘या’ फोटोवर होत आहेत मजेदार मिम्स व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -