Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Good News! विरुष्काला झाले कन्यारत्न

Good News! विरुष्काला झाले कन्यारत्न

आज ११ जानेवारी २०२१ रोजी ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये अनुष्काने बाळाला दिला जन्म

Related Story

- Advertisement -

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. विराटने स्वतःहा ही आनंदाची बातमी चाहत्यासह शेअर करताना या संदर्भातील माहिती ट्विटरवरून दिली. आज ११ जानेवारी २०२१ रोजी ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये अनुष्काने बाळाला जन्म दिला.

असं म्हणाला विराट…

‘आम्हाला आज दुपारी मुलगी झाल्याचं जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. तुमच्या प्रेम आणि शुभाशीर्वादांसाठी आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघींची प्रकृती ठीक आहे. आम्हाला आयुष्याचा हा टप्पा अनुभवायला मिळाला, हे आमचं सुदैवच. आम्हाला या क्षणी प्रायव्हसी जपायची आहे, हे तुम्ही समजून घ्याल, अशी आशा आहे’ असे ट्विट विराट कोहलीने केले आहे

- Advertisement -

ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नबंधनात अडकले होते. सध्या अशीही चर्चा आहे की, अनुष्का आणि विराटच्या मुलीला ‘करोनिएल’ म्हणून संबोधले जाणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे कोरोना काळात जन्माला आलेल्या बाळांना ‘कोरोनिएल’ या विशेष नावाने संबोधले जाते. एवढंच नाही तर या महामारीच्या काळात जन्मलेल्या बाळांना ‘कोविड- किड’ म्हणूनही संबोधले

- Advertisement -