अनुष्का शर्माच्या घरी आली नवी पाहूणी; फोटो शेअर करून केले स्वागत

या नव्या पाहूण्याचे स्वागत अनुष्काने हटक्या स्टाईलमध्ये केले आहे.

Mumbai

अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. अनुष्का आणि क्रिकेटर विराट कोहली हे दोघे लग्न बंधनात अडकल्यापासून नेहमीच त्याच्या खाजगी आयुष्याबाबत चर्चेत असतात. अगदी पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्यात पती विराट कोहली सोबत टाईम स्पेंड करण्यापासून ते सोशल मीडियावर फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना खुश करत असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

नुकताच, अनुष्काने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या घरी नवी पाहूणी आल्याचे ती सांगतेय. या नव्या पाहूण्याचे स्वागत अनुष्काने हटक्या स्टाईलमध्ये केले आहे.

View this post on Instagram

Sun soaked and stoked ☀️💞 #throwback

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्रामस्टोरीवर या नव्या पाहूण्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो कोणत्याही व्यक्तीचा नसून एका मांजराच्या पिल्लाचं आहे. या फोटोमध्ये एका लहान मांजराचे पिल्लू दूध पितांना दिसतेय. हा फोटो सोशल मीडियावर फोटो शेअर करताना ‘आमची आजची डिनरची पाहूणी’, असे लिहिले आहे. यामुळे अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.