घरमनोरंजनशेवंतासाठी अपूर्वा घेतेय विशेष मेहनत

शेवंतासाठी अपूर्वा घेतेय विशेष मेहनत

Subscribe

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे. ही शेवंता सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भाग प्रेक्षकांना आवडत आहे. या  मालिकेत  जेव्हापासून  शेवंताचीएंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे. अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे.

शेवंताची लोकप्रियता इतकी वाढली आहे कि सोशल मीडिया साईट्सवर देखील शेवंताचे मिम्स, पोस्ट्स, फोटोज आपल्याला दररोज पाहायला मिळतात. हि व्यक्तिरेखा जितकी लोकप्रिय झाली आहेतितकंच ती साकारणं हे अपूर्वासाठी आव्हानात्मक होत आहे.  हि व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने वजन देखील वाढवलं आहे.

- Advertisement -

शेवंतासाठी खास तयारी

“शेवंता हीअण्णांना शोभून दिसली पाहिजे म्हणून मालिकेची संपूर्ण टीम, झी मराठी वाहिनीची टीम आणि आमचे दिग्दर्शक खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे मी डोळे झाकून त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं पालनकरतेय. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी शेवंताच्या भूमिकेसाठी ५ ते ७ किलो वजन वाढवलं आहे. प्रत्येक कलाकार हा एका आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात असतो आणि तशी भूमिका मिळणं देखीलनशिबाचा भाग आहे. शेवंता ही जरी खूप सुंदर आणि मादक असली तरी ती छिछोर वाटली नाही पाहिजे याची दखल मला सतत घ्यावी लागतेय. जेव्हा मी प्रेक्षकांसमोर शेवंता म्हणून आले तेव्हापासून मला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर तर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे सगळं पाहून मला खूप बरं वाटतंय. माझ्या कामाची मला पावतीमिळतेय आणि अजून जोमात काम करायची उमेद देखील मिळते. असं अपूर्वा शेवंता या भुमिकेबद्दल बोलताना म्हणाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -