घरमनोरंजन'या' दोन व्यक्तींमुळे अरिजीत सिंगला मिळाला चित्रपटसृष्टीत मोठा ब्रेक

‘या’ दोन व्यक्तींमुळे अरिजीत सिंगला मिळाला चित्रपटसृष्टीत मोठा ब्रेक

Subscribe

सोनी वाहिनीवरील ‘फेम गुरुकुल’ या रिअॅलिटी शोद्वारे २००५ मध्ये अरिजीतने संगीतातील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली

रोमॅण्टिक गाणी म्हटलं की नकळत त्या सुप्रसिद्ध गायकाचे नाव आवर्जून प्रत्येक तरूणाच्या ओठी येते. त्याच्या हृदयाला भिडणाऱ्या आवाजाने अनेकांना आपापल्या भावविश्वात रममान होण्यास भाग पाडले. तो गायक म्हणजे अरिजीत सिंग. आज त्याचा ३२वा वाढदिवस. ३२व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या अरिजीतने कमी वयात एवढा आवाका गाठलाय की प्रत्येक तरूणाच्या मनावर भुरळ घातली आहे. त्याच्या बेधुंद करणाऱ्या आवाजाने प्रत्येक तरूणाचे डोळे नक्कीच एकदातरी पाणावले असणार हे ही तितकेच खरे.

- Advertisement -

अरिजीतचा जन्म २५ एप्रिल १९८७ रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं झाला. त्याचे वडील पंजाबी तर आई बंगाली आहे. सोनी वाहिनीवरील ‘फेम गुरुकुल’ या रिअॅलिटी शोद्वारे २००५ मध्ये अरिजीतने संगीतातील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली यासोबत करिअरची सुरूवात करताना तबला हे वाद्य वाजवण्यापासून केली. लहानशा शहरातून बाहेर पडून त्याने आपले व्यक्तिमत्त्व आणि जिद्दीच्या जोरावर आपली वेगळी ओळख आज निर्माण केली आहे. २००६ मध्ये मुंबईत शिफ्ट झाल्यावर अरिजीतची मेहनत सार्थ ठरली. २०१४ नंतर अनेक प्रकारची गाणी ऐकायला मिळाली आणि तरूणाई त्याच्या आवाजाचे चाहते झाले.

- Advertisement -

अरिजीत आपल्या आवाजासोबत गिटार, पियानो, तबला हे वाजवण्यासोबत म्युझिक डायरेक्टर, स्कोर कम्पोजर, म्युझिक प्रोड्यूसर ही आहे. हिंदी भाषेशिवाय अनेक भाषांमध्ये गाणे गायले आहे. २००५ मध्ये अरिजीत सिंगने एका रियलिटी शो ‘फेम गुरुकुल’मध्ये सहभाग घेतला होता. हा सहभाग यशाचा पहिला टप्पा मानला जातो. या शोचा विजेता झाल्यानंतर अरिजीतला दिग्दर्शक संजय लीला भंसाली आणि चित्रपट निर्माता रमेश कुमार तौरानी यांनी एक संधी दिली. यामुळेच अरिजीतला सिंगला चित्रपचसृष्टीत मोठा ब्रेक मिळाला. २०१३ साली मिर्ची म्युझिक अवॉर्डवर आपले नाव कोरले. त्यानंतर अनेक चित्रपटाचे गाणं त्याने गायले.

२०११ मध्ये ‘मर्डर २’ चित्रपटातील ‘फिर मोहब्बत’ गाण्याद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये गायक म्हणून सुरुवात केली. यानंतर अरिजीतने संगीतकार प्रीतमबरोबर ‘एजंट विनोद’, ‘प्लेअर्स’, ‘कॉकटेल’ आणि ‘बर्फी’सारख्या चित्रपटांसाठी गाणी गायली. अरिजीतला खरी ओळख ‘आशिकी २’मधील ‘तुम ही हो’ या गाण्याने दिली. या गाण्यासाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले. २०१४ मध्ये त्याने प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमानबरोबरदेखील काम केलं. आज अरिजीत जगभरात गाण्याचे कार्यक्रम सादर करत असून, त्याला ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येत चाहते उपस्थित असतात. अरिजीतचे गाणं प्रत्येक वयोगटातील लोकांना आवडतात. परंतु तरूण वर्गातील त्याचे अधिक चाहते आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -