घरमनोरंजन'नमस्ते इंग्लंड'मध्ये भारताच्या नकाशात काश्मीर गायब

‘नमस्ते इंग्लंड’मध्ये भारताच्या नकाशात काश्मीर गायब

Subscribe

'नमस्ते इंग्लंड' मध्ये देशाचा नकाशा चुकीचा दाखवल्यामुळं आता निर्मात्यांपुढे अडचण निर्माण होण्याची शक्यता झाली आहे.

‘नमस्ते इंग्लंड’चं पोस्टर प्रदर्शित झालं आणि लगेच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये भारताचा नकाशा दाखवण्यात आला आहे आणि या नकाशातून चक्क काश्मीरच गायब आहे. इतकंच नाही तर पोस्टरच्या उजव्या बाजूला जम्मू – काश्मीर राज्यातील अक्साई चीन हा भागच दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळं देशाचा नकाशा चुकीचा दाखवल्यामुळं आता निर्मात्यांपुढे अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांना कायदेशीर अडचणींचादेखील सामना करावा लागू शकतो. भारतीय कायद्यानुसार, नॅशनल मॅप पॉलिसी २००५ प्रमाणे भारतीय नकाशा चुकीचा दर्शवणे हा भंग आहे. तर, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, १९६१ अन्वये, भारतीय सीमा चुकीच्या दर्शवल्यास, तुरूंगवास अथवा दंड अशा स्वरुपाच्या शिक्षेला गुन्हेगार पात्र ठरू शकतो.

अक्साईसाठी भारत आणि चीनमध्ये वाद सुरु

अक्साई या भागासाठी भारत आणि चीनमध्ये सध्या वाद सुरु आहेत. सीमाप्रश्नावरून भारत आणि चीन या दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. या वादावर सध्या तोडगा काढण्याचं काम चालू आहे. पण अजूनही कोणत्याही तोडग्यावर दोन्ही देश आलेले नाहीत. त्यामुळं अक्साई चीन हा भाग भारताच्या नकाशात न दाखवण्यात आल्यामुळं या चित्रपटाच्या निर्मात्यांना आता अडचणींना सामना करावा लागू शकतो. नियमाचा भंग केल्यामुळं आता नक्की काय कारवाई होणार हे पाहावं लागेल. मात्र अजूनही यावर निर्माते वा दिग्दर्शकानं कोणत्याही प्रकारचं भाष्य यासंदर्भात केलं नाही.

- Advertisement -

अर्जुन आणि परिणीतीची प्रमुख भूमिका

‘नमस्ते इंग्लंड’ चित्रपटामध्ये अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा या दोघांच्या प्रमुख भूमिका असून ‘इशकजादे’ चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनी दोघे एकत्र येत आहेत. दरम्यान विपुल अमृतलाल शाहच्या २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नमस्ते लंडन’ चा हा सिक्वल आहे. १९ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -