मलायका-अर्जुनचे एप्रिल २०१९ मध्ये लग्न ?

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही जोडी पुढील वर्षात एप्रिलमध्ये विवाहबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai
Malaika Arora and Arjun Kapoor
मलाइका आणि अर्जुन कपूर एकत्र

सध्या बॉलीवूडमध्ये लग्नसराईचे वारे वाहू लागले आहेत. लवकरच रणवीर सिंग-दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा-निक जोन लग्नगाठ बांधणार आहेत. त्या निमित्ताने रणबीर कपूर आणि आलिय भट्ट यांच्यासह आणखी एका हॉट कपलच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. ती म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. ही जोडी पुढील वर्षात एप्रिलमध्ये विवाहबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतः करण जोहरने वक्तव्य केलं आहे.

वाचा : मलायका – अर्जुन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार

करणच्या शोमध्ये उलगडले गुपीत

गेल्या काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुनच्या प्रेमसंबंधांवर बरीच चर्चा रंगली होती. लवकरच ही दोघ आपलं नात उघड करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता थेट लग्नाच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. नुकतेच करण जोहर याच्या कॉफी विथ करण या शोमध्ये अभिनेता आमिर खान याने उपस्थिती लावली होती. यामध्ये थोड्यावेळासाठी मलायका अरोरादेखील सामिल झाली. मजेमजेत करणने मलायका आणि अर्जुनच्या नातेसंबंधाबाबतचा विषय काढला. त्यानंतर ही दोघ एप्रिल २०१९ ला विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा बी टाऊनमध्ये होऊ लागल्या आहेत.

वाचा : ‘मलायका अरोरा’चा जलवा ४५ व्या वर्षीही कायम

अनेकदा असतात एकत्र

सध्या मलायका अरोरा छोट्या पडद्यावरील इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये परिक्षकेच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच या शोमध्ये अर्जुन कपूरने पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी मलायकाने तिचा ४५ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अर्जुनही उपस्थित होता. दोघेही मिलानवरून एकत्र मुंबईला परतले. मलायका आणि अर्जुनला मिलान विमानतळावर हातात हात घेतलेले पाहण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here