अर्जून कपूरला कोरोनाची लागण; इन्स्टावर पोस्ट लिहित दिली माहिती

रकुल प्रीत सिंहसोबत करत होता शूटिंग

अर्जून कपूर
Advertisement

कोरोनाने आता मनोरंजन विश्वाला देखील विळखा घातल्याचे समोर येत आहे. मालिका आणि चित्रपटाच्या शुटिंगला परवानगी मिळाल्याने नियमाचे पालन करत मनोरंजन विश्वातील काम पुन्हा सुरू झाले आहे. असे असले तरी कलाकार मंडळींना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसतेय. अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित खुद्द अर्जुनने याबद्दलची माहिती दिली.

दरम्यान, अर्जुनला कोणतीच लक्षणे नसून सध्या त्याला घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग तो अभिनेत्री नीना गुप्ता व रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत फिल्म सिटीमध्ये करत होता. अर्जुनला कोरोनाची लागण होताच या चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे अर्जुनने एक दिवस आधीच या चित्रपटाच्या अपडेटबद्दल सोशल मीडियावर सांगितले होते. अर्जुनने स्वतःचा एक फोटो शेअर करत चित्रपटाच्या निर्मात्यांचे आभार मानले होते. कोरोनाच्या पाश्वभूमीवर निर्मात्यांनी सर्व सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण गोष्टी पुरवल्याबद्दल अर्जुन कपूरने त्यांचे आभार मानले होते.

अशी केली अर्जुनने पोस्ट…

‘मला कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती तुम्हाला देणं हे माझं कर्तव्य आहे. मी स्वतःला घरी क्वारंटाइन करून घेतलं आहे. तुम्ही सर्वांनी जो मला पाठिंबा दिला त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. मी वेळोवेळी तुम्हाला हेल्थ अपडेट देत राहीन.’ असे अर्जुनने पोस्ट करून म्हटले आहे.


Sushant Sing Rajput Case: रिया चक्रवर्तीला NCB अधिकाऱ्यांनी बजावलं समन्स