तेजश्रीच्या सासूचे ठरलं लग्न

तेजश्रीच्या सासूचे अखेर लग्न ठरलं असून आजोबा कन्यादान करणार आहेत. तर तेजश्री प्रधान करवली असणार आहे.

Mumbai
asavari and abhijeet raje wedding in aag bai sasubai serial on zee marathi
अभिनेत्री तेजश्री प्रधान

प्रेमाला कोणतीही परिसीमा किंवा व्याख्या नसते. त्याचप्रमाणे प्रेमाला वयाची मर्यादा किंवा समाजाच बंधनंही नसत आणि असलं, तरीही साथीदाराचा विश्वास आणि आपल्या माणसांची साथ या संघर्षालाही काहीशी सुकर करुन जाते. याचीच प्रचिती देणारी एक मालिका काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. ती मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’.

आजोबा करणार कन्यादान

निवेदिता सराफ, गिरिश ओक, तेजश्री प्रधान, रवी पटवर्धन, आशुतोष पत्की यांच्या मुख्य भूमिका असलेली मालिका आता एका अतिशय रंजक वळणावर आली आहे. आजोबा त्यांचे मत बदलून या लग्नासाठी तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या परवानगीनेच आसावरी आणि अभिजीत यांच्या लग्नाची लगबग चालू झाली आहे. रविवार, १९ जानेवारी या दिवशी लग्नाचा मुहूर्त निघाला आहे. सासूबाईंचा हा लग्नसोहळा प्रेक्षकांना १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या विशेष भागात पाहायला मिळेल. आजोबा स्वतः असावारीचे कन्यादान करणार असून शुभ्रा ही आपल्या लाडक्या सासूबाईंची करवली होणार आहे. हा लग्नसोहळा अविस्मरणीय असेल यात शंकाच नाही. अभिजीत आणि आसावरी ही दोन्ही पात्र साकारणाऱ्या निवेदिता सराफ आणि गिरिश ओक या कलाकारांचे सध्या प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक करण्यात येत आहे. शिवाय आता या पुढे ‘सासूबाईं’चा प्रवास कसा असणार याविषयीसुद्धा कुतूहल व्यक्त केले जात आहे.


हेही वाचा – ‘मी पुन्हा येईन’ आमिर खानचे बारामतीमध्ये वक्तव्य


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here