घरमनोरंजनबिग बींनी दिल्या आषाढी एकादशीच्या मराठमोळ्या शुभेच्छा

बिग बींनी दिल्या आषाढी एकादशीच्या मराठमोळ्या शुभेच्छा

Subscribe

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यासाठी 'बिग बीं'च खास मराठमोळं ट्वीट

आज सर्वत्र आषाढी एकादशीचा जल्लोष पहायला मिळत आहे. तर अवघ्या पंढरपुरातील विठुनामाच्या जयघोषामध्ये तल्लीन झालेल्या समस्त वारकऱ्यांना बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील शुभेच्छा दिला आहेत.

बॉलिवूड विश्वात बिग बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी आजच्या आषाढी एकादशी या दिवसाच्या निमित्ताने सर्वच वारकऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना मराठी भाषेत दिल्या आहे. या शुभेच्छा देताना त्यांनी मराठमोळ्या भजनाच्या काही ओळी शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

ट्विट वरून शुभेच्छा देताना ‘हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’, अशी विनवणीही बच्चन यांनी पांडुरंगाला केली आहे.

- Advertisement -

आकर्षक पेहरावात विठ्ठल रखुमाईचे फोटो अमिताभ यांनी शेअर करत सर्वांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -