घरमनोरंजन‘आसूड’ रडायचं नाही लढायचं

‘आसूड’ रडायचं नाही लढायचं

Subscribe

शेतकर्‍याची जीवनशैली पूर्णत: बदललेली आहे. शेती विकून ऐशोआरामात राहणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढलेली आहे. पिढीजात व्यवसाय म्हणून काही शेतकर्‍यांचा कष्टावर भरवसा आहे. ज्याला अपयश येतं तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. या अपयशाच्या मागे सत्तेवर असलेले राजकारणी आहेत. त्याचे उगमस्थान दिल्ली आहे. शेती अभ्यासक्रमात पदवीधर झालेल्या शिवाजीला हे सारं बदलायचं आहे. गावापासून सुरू झालेला हा संघर्ष ‘आसूड’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. ‘रडायचं नाही लढायचं’ असं ठासून सांगणार्‍या या सोहळ्याचे संगीतकार अन्नू मलिक हे आकर्षण होते.

महाराष्ट्रात प्रामुख्याने ज्या दोन-चार गोष्टींवर सत्ताधारी, नागरिक पोटतिडकीने बोलतात त्यात पाणीप्रश्न, दुष्काळ, प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र यावर बोलत असताना ज्या विषयाची तीव्रता महाराष्ट्राला अधिक जाणवते ती म्हणजे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्न. हिंदी चित्रपटात तो जाणीवपूर्वक दाखवला गेला; पण मराठी चित्रपटांमध्ये सखोलपणे त्याचे दर्शन घडलेले आहे. निलेश जळमकर या लेखक, दिग्दर्शकालासुद्धा शेतकर्‍यांचा हा प्रश्न जाणवला. ‘आसूड’ या चित्रपटाच्या माध्यमातून हा दाखवण्याचा तो प्रयत्न करणार आहे. यातला नायक हा शेतीविषयक पदवीधर आहे. शेतकर्‍यांच्या अवहेलनेला सत्ताधारी कारणीभूत आहेत. त्याविरूद्ध त्याने लढण्याची तयारी दाखवलेली आहे.

चित्रपटातून शेतकर्‍यांच्या समस्या मांडल्या गेल्या असल्या तरीही दिग्दर्शकाने यातून प्रेक्षकांची अभिरुचीही जपली जाईल, असा प्रयत्न चित्रपटात केलेला आहे. चित्रपट कलात्मक असो किंवा व्यावसायिक असो, चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी निर्मात्याला यातली गाणी प्रकाशित करणे महत्त्वाचे वाटलेले आहे. ‘आसूड’मधल्या तीन गाण्यांच्या प्रकाशन सोहळ्याला कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होतेच; पण सामाजिक बांधिलकी मानणार्‍या दिग्गज व्यक्तीही या सोहळ्याला उपस्थित राहिल्या होत्या. संघर्ष गीत, चेतना वाढवणारे गीत आणि यातच आयटन साँगही चित्रीत झालेले आहे ज्याला अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेले आहे.

- Advertisement -

चित्रपटात व्यवसायापेक्षा काही सांगण्याचा प्रयत्न झाला की कोणी निर्माता पुढे यायला मागत नाही. दीपक मोरे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. चित्रपटाशी त्यांचा फारसा संबंध नाही. पण एक भारतीय जागरुक नागरिक या नात्याने समाजकार्य आपल्या हातून तेही व्यापक प्रमाणात व्हावे या एका हेतूने ‘आसूड’ची त्यांनी निर्मिती केलेली आहे. शेतकर्‍यांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत. ज्या गावात त्यांचे वास्तव्य आहे त्या गावात गाडगे महाराज यांच्या समाजकार्याचा प्रभाव त्यावेळेपासून आजही आहे. माध्यम बदलले तरी या नव्या युगात ‘आसूड’ हा चित्रपट तसेच काहीसे कार्य करणार आहे, असा विश्वास मोरे यांच्या मनात निर्माण झालेला आहे. विजय जाधव हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. शिवाजीची मुख्य व्यक्तिरेखा अमित्रियण पाटील या अभिनेत्याने साकार केलेली आहे. रश्मी राजपूत ही या चित्रपटाची नायिका आहे. विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, कमलेश सावंत, संदेश जाधव, उपेंद्र दाते यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे.

अन्नूने ऋण व्यक्त केले

मराठी बोलता येत नाही, पण मराठी समजते. मुंबईत जन्मलो, महाराष्ट्राबद्दल मला प्रेम आहे. ‘जय महाराष्ट्र’ या शब्दात मी महाराष्ट्राबद्दल अभिमान व्यक्त करतो. सुधीर फडके, भीमसेन जोशी यांच्या संगीताचा माझ्यावर प्रभाव आहे. माझ्यातल्या संगीतकाराला घडवण्यात महाराष्ट्रातील संगीतकारांचे, कलाकारांचे योगदान आहे. मी संगीत द्यावे यासाठी यापूर्वी अनेक दिग्दर्शकांनी माझ्याशी संपर्क साधला होता. पण निलेशने ज्या पद्धतीने ही कथा ऐकवली त्यासाठी मी संगीत द्यायला हवे हे निश्चित झाले. कुठलेही बंधन न ठेवता लागलीच या चित्रपटाला संगीत देऊ शकलो याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे अन्नू मलिक यांनी यावेळी सांगितले. ऍड. अनंत खेळकर, निलेश जळमकर, किशोरबळी यांनी ही गीते लिहिलेली आहेत. सोनू निगम, आदर्श शिंदे, दिव्या कुमार यांचा स्वर या गीतांना लाभलेला आहे. अन्नू मलिक यांचे चिरंजीव अमोल मलिक यानेसुद्धा यात एक गीत गायिलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -