अवघ्या १५ वर्षाच्या वयात अभिनेत्री रेखाचा झाला होता विनयभंग

Mumbai
Bollywood actress Rekha
बॉलिवूड अभिनेत्री रेखा

बॉलिवूड अभिनेत्री रेखा आज यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचली आहे. रेखाने भरपूर चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय रेखाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले. लाखो चाहत्यांच्या मनावर रेखाने अधिराज्य गाजवले. मात्र, या सर्वोच्च शिखरावर पोहचण्यासाठी रेखाला प्रचंड खस्ता खाव्या लागल्या. चित्रपटसृष्टीमध्ये महिलांवर अत्याचार होण्याच्या बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. बऱ्याच महिलांनी ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत याबाबत वाचा फोडली आहे. रेखासोबतही वयाच्या १५ व्या वर्षी असाच गैरप्रकार झाला होता. एका चित्रपटाच्या शूटींगदरम्यान तिचा विनयभंग झाला होता. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक यासीर उस्मान यांनी लिहिलेल्या ‘रेखा-एन-अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

‘अंजाना सफर’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान विनयभंग

यासीर उस्मान यांनी पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, रेखा तेव्हा १५ वर्षांची होती. ‘अंजाना सफर’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान हा गैरप्रकार घडला. एका रोमॅटिंक गाण्याचे शूट सुरु होते. सेटवर गेल्यावर दिग्ददर्शकाने अॅक्शन म्हणताच क्षणी अभिनेते बिस्वजीतने ओठांवर किस करायला सुरुवात केली. बिस्वजीत सलग पाच मिनिट रेखाला किस करत राहिला. परंतु, तरीही दिग्ददर्शकने कट म्हटले नाही. हा सर्व प्रकार युनिटचे लोक बघत होते. त्यांनी शीळ वाजवायला सुरुवात केली. रेखाला या सीनबद्दल काहीच माहिती नव्हती. अभिनेत्याने रेखाला घट्ट पकडून किस केले. बिस्वजीत सोडत नव्हता आणि कॅमेराही चालू होता. त्यामुले रेखा काही करु शकली नाही. अखेर रेखाच्या डोळ्यांमधून अश्रू आले. मात्र, सेटवर उपस्थित लोकांपैकी कुणीही तिच्यासाठी पुढे आले नाही. रेखाने याप्रकरणी आवाज उठवायचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या मनात बदनामीची भीती दाखवली गेली.