घरमनोरंजनप्रोमोतलं गाणं चित्रपटात वाजवलं नाही; जबरा फॅनची कोर्टात याचिका!

प्रोमोतलं गाणं चित्रपटात वाजवलं नाही; जबरा फॅनची कोर्टात याचिका!

Subscribe

१५ एप्रिल २०१६ साली शाहरूख खानचा ‘फॅन’ चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्या आधी ‘फॅन’ चित्रपटाच्या प्रोमोमध्ये एक गाणं दाखवण्यात आलं होतं. शहारूखच्या फॅन्सला हे गाणं आवडलं देखील. मात्र मुख्य चित्रपटातूनच हे गाणँ वगळण्यात आलं होतं. केवळ प्रमोशनल सॉंग म्हणून या गाण्याचा वापर करण्यात आला. पण अनेक फॅन्स केवळ हे गाणं ऐकून चित्रपट बघायला गेले होते त्यांची मात्र चांगलीच निराशा झाली. ‘फॅन’ सिनेमाच्या प्रोमोमधलं गाणं प्रत्यक्ष चित्रपटात न दाखवल्याने ‘यशराज फिल्म्स’ कंपनीला ग्राहक आयोगाने दणका दिला आहे. औरंगाबादच्या तक्रारदार शिक्षिकेला 15 हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे गाणं पाहून औरंगाबादची ‘जबरा फॅन’ शिक्षिका आफरीन फातिमा जैदी चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. औरंगाबादच्या एका शाळेतील शिक्षीकेने फॅन चित्रपट बघितल्यानंतर चित्रपटात ते गाणं नसल्यामुळे ‘फॅन’ चित्रपटाचे निर्माते ‘यशराज फिल्म्स’विरोधात तिने तक्रार दाखल केली. आपल्याला 58 हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तिने तक्रारीत केली. परंतु जिल्हास्तरीय ग्राहक मंचाने जैदीची याचिका फेटाळली. त्यामुळे तिने थेट महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाचा दरवाजा ठोठावला.
राज्य ग्राहक आयोगाने यशराज फिल्म्स ला दणका दिला. आफरीनच्या तक्रारीत तथ्य असल्याचं सांगत, खटला दाखल करण्यासाठी आलेल्या खर्चाचे ५ हजार रूपये आणि १० हजार रूपयांची नुकसान भरपाई असे १५ हजार रूपये शिक्षीकेला देण्याचे आदेश आयोगाने ‘यशराज’ला दिले.

- Advertisement -

राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात यशराजचं आव्हान

चित्रपटातून गाणे काढून टाकणे ही एक अयोग्य व्यवसायिक पध्दत असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. जाहीरातीतील गाणे पहिल्यानंतर एखाद्या प्रेक्षकाने चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. जर ते गाणे दिसत नसेल तर तो स्वत:ची फसवणूक झाल्याचं समजणं सहाजिक आहे. अशामुळे प्रेक्षक निराश होऊन वैतागतो. प्रेक्षकांना सिनेमागृहात आणून नफा मिळविणे हा सिनेनिर्मात्यांचा हेतू असल्याचं स्पष्ट दिसतं, असे ताशेरे ग्राहक आयोगाने ओढले. ‘यशराज फिल्म्स’ने महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाच्या निर्णयाला राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात आव्हान दिलं. परंतु राष्ट्रीय ग्राहक आयोगानेही यशराज कंपनीला दिलासा देण्यास नकार दिला. राज्य आयोगाचा मागील निर्णय कायम ठेवत शिक्षिकेला 15 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.


हे ही वाचा – कमल हासनच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात; ३ ठार,१० जखमी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -