‘आम्हाला मंदिरं- मशिदी, पुतळे,कलमं आणि त्यावरुन कुठलाही ‘वाद’ नकोय!’

Mumbai

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर गायक, संगीतकार अवधूत गुप्तेने दिल्लीकरांचे अभिनंदन केले आहे. ऐतिहासिक निकाल देऊन दिल्लीकरांनी जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातील संदेश दिला आहे असे ट्वीट अवधूतने केले आहे. हे ट्विट करत अवधूतने अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ‘आप’ने ६२ जागांवर विजय मिळवला.

अवधूतने ट्विटमध्ये लिहीलं आहे की, “असा ऐतिहासिक निकाल देऊन दिल्लीकरांनी जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातील संदेश दिलाय की आम्हाला शाळा, रस्ते आणि महिलांची सुरक्षा हवीये. मंदिरं, मशिदी, पुतळे, कलमं आणि त्यावरुन कुठलाही वाद नकोय! अभिनंदन दिल्लीकर!”

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा केजरीवाल यांचेच सरकार आलं असून केजरीवाल यांनी हॅट्ट्रिक केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा विजय ऐतिहासिक मानला जातो. निवडणुकीत ५५ जागा मिळण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या भाजपाला केवळ आठच जागा जिंकता आल्या. काँग्रेसला पुन्हा खातेही उघडता आले नाही. केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानताना माझ्यावरील विश्वास सार्थ करून दाखवू, असे म्हटले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here