घरमनोरंजनअशा दिल्या बॉलिवूडकरांनी अयोध्या निर्णयावर प्रतिक्रिया

अशा दिल्या बॉलिवूडकरांनी अयोध्या निर्णयावर प्रतिक्रिया

Subscribe

या निर्णयाचे राजकीय नेतेमंडळीकडून स्वागत करण्यात आले तसेच, न्यायालयाच्या या निर्णय़ाचे बॉलिवूड कलाकारांनी देखील स्वागत केले

अनेक दशकांपासून रखडलेल्या या अयोध्या वादग्रस्त प्रकरणावर आज निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. यावेळी अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंचीच असून त्यांना द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. या निर्णयाचे राजकीय नेतेमंडळीकडून स्वागत करण्यात आले तसेच, न्यायालयाच्या या निर्णय़ाचे बॉलिवूड कलाकारांनी देखील स्वागत केले आहे.

अयोध्या निर्णयावर बॉलिवूडकरांनी दिल्या या प्रतिक्रिया

- Advertisement -

लेखक चेतन भगतने या निर्णयावर ट्विट करत “जे काही होईल, शांती भंग देवाची करण्याची कधीही इच्छा नसते. याला अशाच प्रकारे ठेवा.”, शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

“माझ्या प्रिय भारतीयांनो सर्वांना विनंती आहे, की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करा. आपल्या सर्वांना एकत्र येऊन देशाला पुढे नेण्याची गरज आहे”, असे ट्विट अभिनेत्री हुमा कुरेशीने केले आहे.

“सर्वांना विनंती आहे, आज येणाऱ्या निर्णयाचा सर्वांनी सन्मान करावा. हा निर्णय तुमच्या बाजूने असो किंवा नसो तरीही त्याचा स्वीकार करा. कारण आपल्या देशाला या सर्वातून वर येण्याची गरज आहे, जय हिंद.”, असे अभिनेता फरहान अख्तरने केले.

अयोध्या निकालानंतर अनुपम खेर यांनी देखील ट्विट केले आहे. विविध राजकीय विषयांवर भाष्य करणारे अनुपम खेर यांनी अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम। सबको सम्मति दे भगवान।, असे ट्विट केले आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूने ‘झाले सर्व आता पुढे ?’ असे एक ट्विट केले

तसेच आणखी ट्विट केले की, पुढे जाऊन आपला देश राहण्यासाठी कशाप्रकारे उत्तम बनवता येईल, यासाठी काम करू.

या निकालाचे स्वागत करताना अभिनेता विवेक ओबेरॉयने महात्मा गांधीचा फोटो शेअर करत शांतीचे श्रेय त्यांना दिले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -