‘बेबी डॉल’ सारखी सुपरहिट गाणी गाणारी बॉलिवूडची गायिका कनिका कपूरला करोना व्हायरसची लागण झाली आहे. शुक्रवारी कनिका कपूरची करोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. सध्या तिला लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीतील हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती कनिका कपूरने इन्टाग्रामवर दिली. नुकतीच ती लंडनहून परतली होती. मात्र मीडियाच्या माहितीनुसार तिने करोनाची लागण झाल्याची गोष्ट लपवून ठेवली होती. इतकच नव्हे तर तिने करोनाची लागण होऊ सुद्धा एका हॉटेलमध्ये तिने डिनर पार्टी ठेवली होती.
करोनाची लागण झाल्यासंदर्भात इन्स्टाग्रामवर सांगताना लिहिलं की, ‘मला गेल्या चार दिवसांपासून करोनाची लक्षणे होती. माझी करोना संदर्भातील चाचणी घेतली असून माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मी आणि माझे कुटुंबीय आयसोलेशनमध्ये आहोत. सध्या करोनाचा सामना यापुढे कसा करायचा यासंबंधी डॉक्टरांच्या सल्लाचे पालन करित आहोत. ज्यांच्याशी माझा संपर्क झाला आहे, त्यासंदर्भात सध्या माहिती घेतली जात आहे. १० दिवसांपूर्वी मला विमानतळावर तपासण्यात आलं होतं.’
नुकतचं एएनआय या वृत्तसंस्थेने देखील कनिकाच्या संदर्भात ट्विट केलं आहे. ट्विट करताना एएनआयने तिचं नाव सांगितलं नाही. उत्तप्रदेशमध्ये आज करोना चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बॉलिवूड गायिकेचा देखील समावेश आहे, अशाप्रकारे एएनआयने ट्विट केलं आहे.
A prominent Bollywood singer is among the four people who have been tested positive for #Coronavirus in Uttar Pradesh today. https://t.co/LBvHWkTXnS
— ANI UP (@ANINewsUP) March 20, 2020
हेही वाचा – मोदींच्या ‘त्या’ निर्णयाचे सेलेब्रेटींनी केले कौतूक…ट्वीट करत लोकांना केले आवाहन!