बालाजी मोशन पिक्चर्सने मागितली पत्रकार संघाची माफी

बालाजी मोशन पिक्चर्स तर्फे एका निवेदनात ही माफी मागून खेद व्यक्त केला

Mumbai

अभिनेत्री कंगना रणौत आणि पीटीआयच्या पत्रकारामध्ये झालेल्या शाब्दिक वादावर आता एकता कपूर यांच्या बालाजी मोशन पिक्चर्सने जाहीर माफी मागितली आहे. बालाजी मोशन पिक्चर्स तर्फे एका निवेदनात ही माफी मागितली असून झालेल्या घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे.

कंगना रणौतच्या आगामी ‘ जजमेंटल है क्या ‘ या चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात कंगना रणौत आणि पीटीआयचे पत्रकार यांच्यामध्ये माणिकर्णीका चित्रपटावरून वाद निर्माण झाला होता. या सर्व प्रकरणावर चित्रपट तसेच मनोरंजन विभागातील पत्रकारांच्या संघानी  कंगना रणौतच्या वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत कंगना रणौतचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.  कंगना रणौतच्या ‘ जजमेंटल है क्या ‘ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित करण्यात आला आहे.

माणिकर्णीका चित्रपटात झाशीची राणी साकारल्या नंतर  कंगना रणौत  या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. विकास बहल यांच्या ‘ क्वीन ‘ चित्रपटानंतर कंगना रणौत आणि राजकुमार राव यांची जोडी ‘ जजमेंटल है क्या ‘ च्या निमित्ताने पुन्हा सिने-रसिकांना पाहायला मिळणार आहे. ‘जजमेंटल है क्या ‘ चित्रपट २६ जुलै ला प्रदर्शित होणार आहेत तेलुगू चित्रपटातील दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी हे या चित्रपटसह हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहे. तर चित्रपटाची कथा कनिका धिल्लोन यांची आहे. एकता कपूर यांच्या बालाजी मोशन पिक्चर्स च्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली आहे.