घरमनोरंजन'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांचा आवाज बदलणार!

‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेबांचा आवाज बदलणार!

Subscribe

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांचा आवाज बदलणार असल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शन संजय राऊत यांनी दिली आहे.

‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हा अनेक शिवसैनिकांनी आणि प्रेक्षकांनी बाळासाहेबांना स्क्रिनवर दिलेल्या आवाजावर नाराजी व्यक्त केली होती. बाळासाहेबांचा जसा प्रभावशाली आवाज होता, तसा आवाज चित्रपटात दिला गेला नसल्याची प्रतिक्रिया उमटत होती. त्यामुळे बाळासाहेबांच्या चित्रपटात बाळासाहेबांचा उभेउभ आवाज आला तर चित्रपट पाहण्याती मज्जाच काही वेगळी असेल, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात होती. बऱ्याच शिवसैनिकांनी सोशल मीडियाच्या मार्फत बाळासाहेबांचा उभेउभ आवाज देण्यात यावा, अशी विनंती केली होती. अखेर, प्रेक्षक आणि शिवसैनिकांची ही हाक शिवसेनेन ऐकली. शिवसेनेने चित्रपटात बाळासाहेबांचा उभेउभ आवाज दिला जावा यासाठी प्रयत्न सुरु केल्याची बातमी सुत्रांकडून मिळत होती. ही बातमी खरी असल्याचे उघड झाले आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय राऊत यांनी स्वत: या बद्दल औपचारिक घोषणा आज केली आहे. आज ‘ठाकरे’ चित्रपटाचे एक गाणं लॉंच झालं. या कार्यक्रमात राऊत बोलत होते.

हेही वाचा  – ‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करा – भाजप

- Advertisement -

‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे’ हे गाणं लॉंच

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ या चित्रपटाचे ‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे’ हे गाणं लॉंच झालं आहे. वॉंद्रे येथील ताज लॅण्ड एण्ड्समध्ये हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चित्रपटाचे निर्माते आणि शिवसेनेचे खासदार संयज राऊत, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी, अभिनेत्री अमृता राव, सहनिर्मात्या पूर्वशी राऊत आणि विधिता राऊत, दिग्दर्शक अभिजीत पानसे, वर्षा राऊत, वायकॉम 18 स्टुडियोजचे अजित अंधारे, निखिल साने, कार्निवल मोशन पिक्चर्सचे अध्यक्ष श्रीकांत भसी आदी लोक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -