घरमनोरंजनअमिताभ बच्चन अडचणीत; मिळाली नोटीस

अमिताभ बच्चन अडचणीत; मिळाली नोटीस

Subscribe

एका जाहिरातीमध्ये अमिताभ यांनी वकिलाचे कपडे घातल्यामुळे त्यांनी नवी दिल्ली बार कौन्सिलकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

सिनेमांमध्ये किंवा नाटकांमध्ये कलाकार वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत असतात. अशावेळी ते साकारत असलेलं पात्र अधिक खरं आणि जिवंत वाटावं यासाठी तशाप्रकराचा मेकअप आणि हेअरस्टाईल आणि मुख्य म्हणजे त्या पात्राला शोभणारे कपडे या गोष्टी कलाकाराला पुरवल्या जातात. पडद्यावर एखादं पात्र जिवंतपणे उभ करण्यामध्ये वेशभूषेचा खूप मोठा सहभाग असतो. मात्र, हीच वेशभूषा बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना चांगलीच महागात पडली आहे. एका जाहिरातीमध्ये अमिताभ यांनी वकिलाचे कपडे घातल्यामुळे त्यांनी नवी दिल्ली बार कौन्सिलकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. एका खासही जाहिरातीसाठी बीग बींनी पांढरा शर्ट, काळा कोट असा वकिलाचा वेश परिधान केला होता. मात्र, त्यावर आक्षेप घेत बार कौन्सिलनी त्यांच्यासह एव्हरेस्ट मसाले, युट्यूब आणि जाहिरातीसंबंधीच्या मीडिया हाऊसला नोटीस पाठवली आहे. याप्रकरणामुळे अमिताभ बच्चन सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. अमिताभ यांनी आजवर असंख्य जाहिरातींमधून काम केले आहे. मात्र, ही जाहिरात आणि त्यामध्ये वकिलाचे कपडे घालणं त्यांना महागात पडल्याचं दिसत आहे.

नोटीसमध्ये नेमकं काय?

एव्हरेस्ट कंपनीच्या मसाल्याच्या जाहिरातीमध्ये अमिताभ यांनी परवानगीशिवाय वकिलाचे कपडे घातले आहेत. अशाप्रकारच्या खासगी जाहिरातीमध्ये गणवेश घालण्यापूर्वी त्यांनी योग्य ती काळजी घेतलेली नाही. त्यामुळे ही जाहिरात तातडीने ऑफ एअर करावी अर्थात बंद करावी असा आदेश या नोटिसमध्ये देण्यात आला आहे. याशिवाय यापुढे कोणत्याच खासगी जाहिरातीमध्ये अशाप्रकारे गणवेश वापरला जाणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असंही सांगण्यात आलं आहे. भविष्यात आम्ही वकिलांचा गणवेश परवानगीशिवाय वापरणार नाही, असं लिखीत स्वरुपात देण्याची मागणीही बार कौन्सिलनं केली आहे. या सर्व प्रक्रियेसाठी बार कौन्सिलने अमिताभ बच्चन आणि जाहिरातीशी संबंधित अधिकाऱ्यांना १० दिवसांची मुदत दिली आहे. आता या प्रकरणाला बीग बी आणि त्यांची टीम काय उत्तर देतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Video: फोल्ड होणार भन्नाट स्मार्टफोन; पाहा फिचर्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -