घरमनोरंजनबजेट छोटं यश मोठं

बजेट छोटं यश मोठं

Subscribe

मनोरंजनविषयी बातम्या वाचा एका क्लीकवर .....

लो बजेटमधल्या पण उत्तम कथानक असलेल्या आणि संवाद, पटकथेवर आधारीत चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवत आहेत. मोठ्या बॅनरची गरज नाही, मोठे सुपरस्टार नसतानाही केवळ कथानकामुळे बॉलिवूडमध्ये त्यांच कौतूक होत आहे. बत्ती गूल मीटर चालू २१ सप्टेंबरला रिलिज झाला. त्यानंतर पहिल्या दिवसांत ६.७६ कोटी, दुसर्‍या दिवशी ७.९६ कोटी, तिसर्‍या दिवशी ८.५४ कोटींचे कलेक्शन केल्याची चर्चा आहे.

रविवारी भारत पाकिस्तान क्रिकेट सामना असल्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली होती.  मनमर्जियामुळे दिग्दर्शक अनुराग कश्यपचं मोठं कौतूक होत आहे. या चित्रपटानं दुसर्‍या आठवड्यात शुक्रवारी ८१ लाख, शनिवारी १ कोटी, रविवारी १.२० कोटींच कलेक्शन केल्याचं म्हटलं जात आहे.  तर स्त्रीची घोडदौड कायम आहे. चौथ्या आठवड्यातील शुक्रवारी जवळपास दीड कोटी, शनिवारी २ कोटी आणि रविवारी २.८६ कोटींच कलेक्शन स्त्री नं केलं आहे. या चित्रपटानं १०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केलं आहे.

- Advertisement -

विनुष्कांनी चाखलं चिमिचुरी मशरुम्स

मुंबई । टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं दिल्लीत नुएवा रेस्टॉरंटमध्ये विराटच्या कुटुंबियांसोबत चिमिचुरी मशरुम्सची चव घेतली. या लंचचे फोटो त्यांनी सोशल मिडियावर टाकले. विराट नुकताच इंग्लडचा दौरा संपवून भारतात परतला आहे. त्यानंतर तो कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. तर अनुष्का आणि वरुन धवनाचा सुई लवकरच पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्का या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यशराज फिल्मच्या हा चित्रपटाचे कौतूक होत आहे.


म्हणून आमिरनं नाक टोचवलं…

मुंबई । आमिर खान आणि अमिताभच्या ठग्स ऑफ हिंदुस्तानची मोठी चर्चा सुरू आहे. यातील अमिताभचा लूक व्हायरल झाल्यावर आमिरखानचा लूकही इंटरनेटवर पहायला मिळत आहे. यशराजसारख्या मोठ्या बॅनरकडून ठग्स ऑफ हिंदुस्तान बनवला जात आहे. चित्रपटांत आमिर एका फिरंगीच्या रुपामध्ये दिसत असून तो घोड्यावर बसलेला आहे. या चित्रपटासाठी आमिरने मोठा वेळ दिला होता. अनेक महिन्यांपासून ठग्स ऑफ हिंदुस्तानचे शूटींग देशविदेशात सुरू होते. या सिनेमासाठीच आमिरने आपले नाक टोचवून घेतले होते. या वयात नाक टोचवल्यामुळे खूप वेदना झाल्याचं आमिरनं सांगितलं. शिवाय चित्रपटांत त्याने कानही टोचवून घेतले होते. कानात आणि नाकांत नकली आभूषणं घालून हा रोल करणं आपल्याला पटत नव्हतं, असं आमिरने स्पष्ट केलं आहे. आमिरनं या चित्रपटांत फिरंगी मल्लाह नावाचं कॅरेक्टर केलं आहे. त्यामुळे हे दुखणं सहन करूनही आपण हो रोल करण्यासाठी परिश्रम घेतल्याचं त्यानं म्हटलं आहे. आमिरला या नव्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक आणि त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

- Advertisement -

अक्षयचे दोन सिनेमे अर्जुनच्या खिशात

मुंबई । अर्जुन कपूरचा आगामी नमस्ते इंग्लड चित्रपट १९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा २००७ मध्ये आलेल्या नमस्ते लंडनचा सिक्वल आहे. अर्जुनच्या जागी दिग्दर्शक विपूल शहा या चित्रपटासाठी अक्षय कुमारला घेणार होते. मात्र अक्षयने टोलवाटोलवी केल्यावर विपूलनं अखेर अर्जुनला घेऊन नमस्ते इंग्लंड बनवायला घेतला. त्यानंतर विपूल आणि अर्जुनमध्ये चांगलंच ट्युनिंग जमलं. आता विपूल सिंग इस किंगचा सिक्वल बनवणार असल्याची माहिती आहे. त्यातही अर्जुन कपूरची वर्णी लागणार आहे. त्यामुळे अक्षयचे दोन्ही सिनेमे आता अर्जुनच्या खिशात गेले आहेत. सिंग इज किंग आणि नमस्ते लंडन या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं होतं. त्यामुळे त्याच्या सिक्वलमध्येही अक्षयच असल्याची चर्चा होती. मात्र अक्षयने याबाबत दिरंगाई केल्यानं आता अर्जुनसोबत हे चित्रपट बनवले जाणार आहे.


अजय देवगणच्या तानाजी ची तयारी सुरू

मुंबई । अजय देवगनच्या तानाजी ची मोठी उत्सुकता बॉलिवूडमध्ये आहे. लवकरच या चित्रपटाचं शूटींग पुन्हा सुरू होणार आहे. मुंबईतल्या वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये वेगवेगळे सेट्स तयार केले गेले आहेत. ज्या ठिकाणी काही प्रसंग चित्रित होणार आहेत. २५ सप्टेंबपासून शूटींगला सुरुवात होणार आहे. यात अजयचे अनेक लूक्स समोर आले आहेत. यातील एकाची निवड तानाजीसाठी फायनल करण्यात आली आहे. अजय देवगणच्या उच्चार आणि संवादांवरही काम सुरू आहे. इतिहासातील उल्लेखनीय आणि लढवय्ये व्यक्तीमत्व तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. मात्र चित्रपटातील इतर कलाकारांची निवडही केली जात आहे. चित्रपटांत सैफ अली खान आणि काजोलही महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार असल्याचे म्हटले आहे. २०१९ च्या अखेरपर्यंत हा चित्रपट बनवला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -