Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन जिया खान मृत्यू प्रकरणावर डॉक्युमेंट्री, सोशल मिडियावर युजर्स व्यक्त करतायंत संताप

जिया खान मृत्यू प्रकरणावर डॉक्युमेंट्री, सोशल मिडियावर युजर्स व्यक्त करतायंत संताप

जिया खानचा मृतदेह तिच्या घरात संशयास्पदरित्या आढळून आला होता

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणाला आता ७ वर्ष उलटून गेले. परंतु हे प्रकरण बीबीसी चॅनल्सने पुन्हा एकदा प्रकाश झोतात आणले आहे. बीबीसीने यावर ‘डेथ इन बॉलिवूड’ ही डॉक्युमेंट्री सिरिज प्रदर्शित केली आहे. ही सिरिज सध्या युकेमध्ये प्रदर्शित करण्यात आली परंतु सोशल मिडियावर या सिरिज घेऊन अधिक ट्रोल केले जात आहे. ११ जानेवारीला या डॉक्युसिरिजचा पहिला एपिसोड रिलीज करण्यात आला. ही सिरिज तीन एपिसोडमध्ये प्रदर्शित होणार होती. परंतु लगेचचं या सिरिजचे दोन एपिसोडही प्रदर्शित करण्यात आले. या डॉक्युसिरिजमध्ये जिया खान मृत्यू प्रकरणाचा एकंदरीत घटनाक्रम दाखवण्यात आला आहे. २०१३ मध्ये जिया खानचा मृतदेह मुंबईतील तिच्या घरात संशयास्पदरित्या आढळून आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांसह सीबीआयने चौकशीअंती जिया खानने आत्महत्या केल्याचे घोषित केले. जियाच्या निधनानंतर तिची आई रबिया खान यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे आजही सांगत आहे. आणि हीच संपूर्ण घटना डॉक्युसिरिजमध्ये दर्शववण्यात आली आहे. जियाचा प्रियकर अभिनेता सुरज पांचोळी याने जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवत त्याला तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाशी थेट संबंध असणाऱ्या पांचोळी कुटुंबाचा कोणतेही उल्लेख या डॉक्युमेट्रीमध्ये दाखवण्यात आला नाही. पण सिरिजमधून याप्रकरणाचा खुलासा करण्यासाठी सुरज पांचोळी याला दाखवण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मिडियावर या सिरिजवर संताप व्यक्त केला जात आहे. अनेक युजर्सने ट्विटरवर या सिरिजला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

जिया खान मृत्यूप्रकरणी जियाचा प्रियकर सूरज पांचोळीला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. पण त्याची काही काळाने निर्दोष मुक्तता करण्यात आली. परंतु आजही जियाचे कुटुंबीय जियाच्या मृत्यूसाठी सूरजचं जबाबदार असल्याचे सांगत आहे. यावर एका युजर्सने संपात व्यक्त करत लिहिले की, मला धक्काच बसला हे ऐकून की, सूरज पांचोळी आणि आदित्य पांचोळीने या डॉक्युमेंट्री सिरिजमध्ये मुलाखत देण्यास तयारी दर्शवली. तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, या डॉक्युमेट्रीतून बॉलिवूडची काळी बाजू दाखवण्यात आली आहे. हे लोकांनी समजणे गरजेचे आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर देखील अद्याप ठोस निर्णय मिळालेला नाही. त्यामुळे याप्रकणातील सतत होणाऱ्या चर्चांमुळे न्याय मिळण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -