सर्वोत्कृष्ट एंटरटेनर बनायचे हेच माझे ध्येय – रणवीर सिंग

'पद्मावत' आणि 'सिंबा' चित्रपटांना भरभरून यश मिळाल्यानंतर रणवीर सिंगने प्रतिक्रिया दिली आहे. मला फक्त सर्वोत्कृष्ट एंटरटेनर बनायचे असल्याचे त्याने सांगितले आहे.

Mumbai
ranveer singh
अभिनेता रणवीर सिंग

बॉलिवूडचा सिंबा रणवीर सिंग याने एकापाठोपाठ हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या चित्रपटांनी तब्बल ५०० कोटींच्या घरात कमाई केली आहे. चित्रपटात त्याने केलेल्या भूमिकांमुळे त्याला शाबासकी मिळत आहे. मात्र “माझे लक्ष हे पैशाकडे नसून मला सर्वोत्कृष्ट एंटरटेनर बनायचे आहे,” अशी प्रतिक्रिया रणवीरने दिली आहे. रणवीर सध्या त्याचा आगामी चित्रपट “गली बॉय”च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या काही दिवसातच त्याचा हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

 

“जेव्हा लोक पैशाबद्दल बोलायला लागतात तेव्हा मी माझे डोके खाजवतो. मी स्वतःला या लहान गोष्टींपासून वाचवले तर चांगले आहे. या गोष्टी मला कुठे घेऊन जातील ते मला माहित नाही. म्हणून मला एक कलाकार म्हणूनच वावरायला आवडेल.” – रणवीर सिंग

दीपिकाने दिल्या सिंबाला विशेष शुभेच्छा

रणवीरचे लग्न झाल्यापासून रणवीर आणि दीपिकाबद्दल अनेक बातम्या आल्या. रणवीरच्या सिंबा चित्रपटाचे फक्त प्रेक्षकच फॅन नाही तर त्याची पत्नी दीपिकाही फॅन असल्याचे दिसून आले आहे. रणवीरने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये दीपिका त्याला सिंबा स्टाइलने शुभेच्छा देताना दिसते आहे. या व्हिडिओखाली रणवीरने “माझी चीअरलिडर” असे लिहिले आहे. लोकांनी या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला आहे. रणवीरने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

My Cheerleader ?❤️?? @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here