दिग्गज बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांनी ८५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिग्गज बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांनी ८५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिग्गज बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांनी ८५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. १५ नोव्हेंबरला दुपारी १२.१५ वाजता सौमित्र चटर्जी यांचं निधन झालं आहे. ६ ऑक्टोबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सौमित्र यांना कलकत्ताच्या Belle Vue रुग्णालयात दाखल केलं होत. सौमित्र यांनी कोरोनावर मात केली होती, पण त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत होती. त्यांना व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आलं होत.

सौमित्र चटर्जी यांच्या निधनामुळे चाहते आणि सेलिब्रिटींना झटका बसला आहे. सोशल मीडियावर सौमित्र चटर्जी यांच्या आठवणी शेअर करून श्रद्धांजली देत आहेत. पश्चिम बंगाचे मुख्यमंत्री ममता बनर्जी सौमित्र चटर्जीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी कलकत्ताच्या Belle Vue रुग्णालयात पोहोचल्या आहेत.

माहितीनुसार, सौमित्र चटर्जी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ६ ऑक्टोबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनातून ते बरे झाले होते. पण कोरोना एन्सेफॅलोपॅथीमुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला होता.

गेल्या ४० दिवसांत न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, कार्डियोलॉजी, क्रिटिकल केअर मेडिसिनमधील तज्ज्ञांची एक मोठी टीम सौमित्र चटर्जी यांची प्रकृती ठीक होण्यासाठी प्रयत्न करीत होती. पण त्यांचा कोणताही प्रयत्न यशस्वी झाला नाही. यावर्षी सौमित्र यांचे ७ चित्रपट प्रदर्शित झाले. माहितीनुसार कोरोनाच्या काळात देखील सौमित्र यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते.


हेही वाचा – ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील ‘जीजी’चं निधन