घरताज्या घडामोडीSushant Sucide case: रियामुळे बंगाली महिला सोशल मीडियावर ट्रोल कारण...!

Sushant Sucide case: रियामुळे बंगाली महिला सोशल मीडियावर ट्रोल कारण…!

Subscribe

सुशांतसिंग राजपुत आत्महत्या प्रकरण दरोरोज वेगळं वळण घेत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  यामध्ये आता सुशांतसिंगच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप केल्यानंतर आता सीबीआयने रिया आणि तीच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. आता या सगळ्यात सोशल मीडियावर बंगाली महिलांनाही ट्रोल केले जात आहे, त्याबद्दल कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर महिलांविरूद्ध सायबर ट्रोलिंगच्या अनेक तक्रारी कोलकाता पोलिसांकडे आल्या. त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पश्चिम बंगाल महिला आयोगाने अनेक तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत. फेसबुक आणि ट्विटरवरून ट्रोलकेल्याबाबत या तक्रारी आहेत. पोलिसांनी अधिक तपासासाठी माहिती मागवली आहे. पश्चिम बंगाल महिला आयोगाच्या अध्यक्षा लीना गांगुली यांच्या म्हणण्यानुसार गेल्या एका आठवड्यात ३० हून अधिक तक्रारी आल्या आहेत. ज्यामध्ये पीडितांनी सोशल मीडियावर ‘बंगाली’ महिलांची बदनामी केली आहे.

- Advertisement -

लीना गांगुली म्हणाल्या की, ‘ही चिंताजनक गोष्ट आहे. विशेषत: सुशांतसिंग राजपूत प्रकरणात बंगाली मुलीचा संदर्भ असल्यामुळे सर्व बंगाली महिलांना ट्रोल केले जात आहे. या बंगाली महिलांना लक्ष करून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत, चुकीची भाषा त्यांच्या विषयी वापरली जात आहे. पण त्या लोकांना असं वाटतं की ते यातून सुटतील पण तसं आम्ही होऊ देणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -