Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अनिता भाभीची भूमिका साकरणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री

अनिता भाभीची भूमिका साकरणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

अनिता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन हिने काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली. त्यानंतर मालिकेत अनिता भाभीची कमी जाणवत होती. मालिकेच्या निर्मात्यांनी आता ही कमी दूर केली आहे.

Related Story

- Advertisement -

टेलिव्हिजन विश्वातला सर्वात सुप्रसिद्ध कार्यक्रम म्हणजे भाभीजी घर पे हैं. या मालिकेची चर्चा अनेक दिवस सुरू आहे. नवीन अनिता भाभी कोण असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. परंतु ही आतुरता आता संपली आहे. कारण नवीन अनिता भाभी आता सिरियलमध्ये दमदार एंट्री घेणार आहे. मराठमोठी अभिनेत्री नेहा पेंडसे आता अनिता भाभीची भूमिका साकारणार आहे. अनिता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन हिने काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली. त्यानंतर मालिकेत अनिता भाभीची कमी जाणवत होती. मालिकेच्या निर्मात्यांनी आता ही कमी दूर केली आहे. आता अभिनेत्री नेहा पेंडसे अनिता भाभीच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)


मिळालेल्या माहितीनुसार, भाभीजी घर पे हैं या प्रसिद्ध मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेसाठी नवीन अभिनेत्रीची अनेक नावे समोर येत होती. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीमधून नेहा पेंडसे या मराठमोठ्या अभिनेत्रीला या भूमिकेसाठी निवडण्यात आले आहे. या मालिकेचे निर्माते संजय कोहली यांनी नेहा पेंडसेची खूप आधीच निवड केली होती. मात्र नेहाचे कन्फरमेशन येणे बाकी होते. आता नेहासुद्धा अनिता भाभीच्या भूमिकेसाठी होकार दिला आहे.

- Advertisement -

सौम्या टंडन ही भाभीजी घर पे हैं या मालिकेत पाच वर्षे अनिता भाभीची भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सौम्याने ही मालिका सोडली. आता नेहा पेंडसी अनिता भाभीची भूमिका साकारणार आहे. नेहाने या आधी कॅप्टन हाऊस, पडौसन या हिट कार्यक्रमात काम केले आहे. नेहा भाग्यलक्ष्मी या मराठी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. आता भाभी जी घर पे हे या मालिकेतून नेहा पुन्हा एकदा प्रेक्षकांसोमर येणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – कॉमेडियन कपिल शर्माने चाहत्यांना दिली खुशखबर

- Advertisement -