घरमनोरंजनगोरी असल्याने 'भाभीजी'ला मिळाले नव्हते काम

गोरी असल्याने ‘भाभीजी’ला मिळाले नव्हते काम

Subscribe

अमेरिकेत एका कृष्णवर्णिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर काळा-गोरा हा भेदभाव पुन्हा समाजामध्ये वादाचा विषय बनला. २१ व्या शतकातही वर्णभेदावरून लोकांचे जीव जात असल्याने जगभरातून या घटनेचा निषेध नोंदवला गेला. मात्र गोऱ्या रंगामुळेही लोकांचे नुकसान होत असल्याची माहिती आता समोर येत आहे. चित्रपट आणि मालिकांमधील अभिनेत्री सौम्या टंडन हिला चक्क गोरी असल्यामुळे काम मिळाले नसल्याचे तिने सांगितले आहे. छोट्या पडद्यावरील भाभीजी घर पर हैं, मालिकेतील या अभिनेत्रीने आपला अनुभव शेअर केला आहे.

एका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये भारतीय महिलेची भूमिका साकारायची होती. याकरता सौम्या ऑडिशन देण्यासाठी गेली. मात्र तुम्ही खुपच गोरे आहात असे सांगून त्यांना नकार देण्यात आला होता. आम्ही भारतीय महिलेला इतकं गोर नाही दाखवू शकत, असेही त्यांनी नमूद केले. माझ्या रंगाकडे बघून त्यांचा विश्वासच बसला नाही की मी भारतीय आहे. त्यांना असे वाटते की अमेरिका, लंडन आणि पाश्चिमात्य देशातील महिलाच गोऱ्या असतात. त्यांची सांगितले की, त्यांना भारतीय महिला दाखवायची आहे. त्यामुळे गव्हाळी वर्णाची महिला हवी आहे. जगासमोर आम्ही कधीही भारतीय महिलेला गोर दाखवू शकत नाही. त्याची ही मानसिकता बनली आहे की भारतीय, बांग्लादेशी, पाकिस्तानी हे गव्हाळी रंगाचेच असतात. अशाप्रकारची मानसिकता ठेवणे चुकीचे आहे, असे सौम्याने सांगितले.

- Advertisement -

नुकतेच फेअर लव्हली या कंपनीने त्यांच्यातील फेअर हा शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सौम्यानेदेखील स्वागत केले आहे. दरम्यान, अनलॉकमध्ये तिने चित्रीकरणाला सुरूवात केली आहे.

हेही वाचा –

‘मीसुद्धा घराणेशाहीच्या राजकारणाला बळी पडलो होतो’; सैफने सांगितला हा अनुभव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -