‘भाई’ चा दुसरा टीझर लाँच!

भाई चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत दोन टिझर लाँच झाले आहे त्यांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Mumbai
P. L. Deshpande Movie
पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

पु.ल देशपांडे यांच्या जीवनावर आधारीत बहुचर्चित भाई चित्रपटाचा दुसरा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये पु. लं ची महाविद्यालयीन काळातील भूमिका अभिनेता सक्षम कुलकर्णी साकारताना दिसत आहे. भाईच्या पहिल्या टीझरमध्ये पु.ल देशपांडे या प्रमुख भुमिकेत अभिनेता सागर देशमुख दिसला. पु.लंची महाविद्यालयीन काळातील भुमिका अभिनेता सक्षम कुलकर्णी या आधी दे धक्का, शिक्षणाच्या आईचा घो, पक पक पकाक या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहचला. आता भाईंची महत्त्वपूर्ण भुमिका सक्षम साकारणार आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ज्यांची पुस्तकवाचून आपण आपलं दुख: विसरून जातो. ज्यांनी आपल्याला मनमुराद हसायला शिकवलं असे आपले सगळ्यांचे लाडके भाई अर्थात पु.ल. देशपांडे. आजपर्यंत पु.ल देशपांडे यांच्या कथेवर अनेक नाटकं, चित्रपट आले आहेत. आता त्यांच्या जीवनावर आधारीत भाई हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत दोन टिझर लाँच झाले आहे त्यांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पु लं चं आयुष्य उलगडणार

महेश मांजरेकर यांच्या ‘फाळकेज फॅक्टरी’ या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘भाई…व्यक्ती की वल्ली’ चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटातून भाई आणि सुनीताबाई यांचे नातं, पु.लंची मित्रमंडळी अशी अनेक पात्र आपल्यासमोर येणार आहेत. या चित्रपटातून जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तीरेखाही प्रेक्षकांना दिसणार आहेत. हा चित्रपट ४ जानेवारी २०१९ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.