घरमनोरंजन'अलिबाग' नव्हे 'आलेपाक' म्हणालो; भारत गणेशपुरेंच स्पष्टीकरण

‘अलिबाग’ नव्हे ‘आलेपाक’ म्हणालो; भारत गणेशपुरेंच स्पष्टीकरण

Subscribe

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात भारत गणेशपुरे यांनी अलिबागकरांच्या भावना दुःखावल्या असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी अलिबागकरांनी केली होती.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘चला हवा येऊ द्या’ यामध्ये एका सादरीकरणादरम्यान अभिनेता भारत गणेशपुरे यांनी ‘आलिबागकरांची’ अवहेलना केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी अलिबागकरांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु या घटनेवर स्पष्टीकरण देताना भारत गणेशपुरे यांनी ‘आलिबाग’ नाही तर ‘आलेपाक’वाले ट्रेनमध्ये घुसखोरी करतात, असं म्हटलं आहे.

नेमक काय आहे प्रकरण

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात भारत गणेशपुरे एका विनोदी सीन दरम्यान सहकलाकाराला ट्रेनमध्ये जसे आलेपाकवाले घुसतात, तसा तू माझ्या् घरात घुसला आहेस, असा संवाद म्हणाले होते. मात्र या संवादामध्ये भारत गणेशपुरे यांनी अलिबागवाले असा शब्द प्रयोग केला असून ही ‘अलिबागरांची’ अवहेलना आहे. तेव्हा त्यांनी माफी मागावी, अशी मागणी अलिबागकरांनी केली होती.

- Advertisement -

‘राज ठाकरेंनी आता चला हवा येऊ द्या पाहावं’!

भारत गणेशपुरे यांच स्पष्टीकरण

या संपूर्ण प्रकरणादरम्यान भारत गणेशपुरे यांनी अलिबागकरांनी फोन करून जाब विचारला असता स्पष्टीकरण देताना भारत गणेशपुरे म्हणाले की, मी आलेपाकवाले असा शब्द प्रयोग केला होता ‘अलिबाग’ नाही. हवं तर तुम्ही माझा संवाद पुन्हा एकदा ऐका. लोकांनी संवाद पुन्हा ऐकला आणि या प्रकरणावर अखेर पडदा पडला. एकंदरीत काय कोणावरही टिका करताना आपल्याकडे त्या घटने संदर्भात संपूर्ण माहिती असायला हवी हेच खर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -