बबन म्हणतोय ‘लागलं याड तुझं’

अभिनेता भाऊसाहेब शिंदे एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

बबन म्हणतोय 'लागलं याड तुझं'

ख्वाडा सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात आपली ओळख बनवणारा कलाकार म्हणजे भाऊसाहेब शिंदे. ‘तुझ्या रूपाचं चांदणं पडलय’ म्हणत भाऊसाहेब शिंदे या मराठमोळ्या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ख्वाडा नंतर बबन या सिनेमात भाऊसाहेब याने मुख्य भूमिका साकारली होती.जातीय वादावर परखडपणे भाष्य करणारा हा सिनेमा होता. भाऊसाहेबचा पहिला सिनेमा म्हणजे ख्वाडा. या सिनेमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. ख्वाडा, बबन या सुपरहिट सिनेमानंतर भाऊसाहेब आता नव्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘लागलं याड तुझं’ हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेता भाऊसाहेब शिंदे हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमातून प्रेमाचे वेगळे रंग पाहता येणार आहे. अर्जुन कदम हा नवा चेहरा सिनेमातून झळकणार आहे. या सिनेमाची कथा प्रेमावर आधारित आहे. नाविन्यपूर्ण,रोमाचंक आणि संगीतप्रधान सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मराठी सिनेमात या आधी कधीच न पाहिलेली गोष्ट या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असे निर्मात्यांनी म्हटले आहे. शकुंतला क्रिएशनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.

२०१५ साली रिलीज झालेल्या ख्वाडा या सिनेमानी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. त्यानंतर २०१८ साली आलेल्या बबन या सिनेमाच्या कथेनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. सिनेमातील गाणी सुपरहिट ठरली होती. लागलं याड तुझं हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातही अभिनेता भाऊसाहेब शिंदे एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.


हेही वाचा – माझा प्रोजेक्ट खराब करू नका, मधुर भांडारकरांनी केली विनंती