चेहऱ्यावर डाग असतानाही भूमी करतेय चित्रपटाचं शूटींग

Mumbai
bhumi pednekar

भूमी पेडणेकर सध्या भर उन्हात उत्तरप्रदेशच्या एका गावात ‘सांड की आँख’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. पण भूमी सध्या एका गोष्टीमुळे त्रस्त आहे. सांड की आँख च्या शुटींगच्या दरम्यान कराव्या लागणाऱ्या मेकअपमुळे भूमीच्या चेहऱ्यावर काळे चट्टे आले आहेत.

मात्र कलाकार हे कायम आपल्या कामाशी बांधील असतात. सगळ्यात आधी कामाल ते प्राधान्य देतात. त्यामुळे भुमिनेही आपल्या कामाला महत्त्व देत शूटींग सुरू ठेवलं आहे. भूमी या चित्रपटात साठ वर्षाच्या महिलेची भूमिका करतेय. त्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीनुसार मेकअप केला जातो. भूमीला हा मेकअप करण्यासाठी जवळपास तीन तास लागतात. या मेकअपमुळे भूमीच्या चेहऱ्यावर काळे डाग आले आहेत. मेकअपच्या या नवीन चेहरा खराब असतानाही दिग्दर्शक निर्मात्याची गैरसोय होऊ नये म्हणून तीने शुटींग सुरू ठेवलं आहे.

उत्तरप्रेदशच्या कडक उन्हामध्ये जवळपास त्यांना आठ तास रोज शूटिंग करावं लागतेय. धुळ आणि कडक उन्हामुळे भूमीची स्किन जळायला लागली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि कथा तुषार हिरानंदानी यांची असणार असून अनुराग कश्यप आणि निधी परमार याची निर्मिती करणार आहेत.

 काय आहे सांड की आँख

‘सांड की आँख’  जगातील एका वयस्कर शार्पशूटर महिलेवर या सिनेमाची कथा आधारीत आहे. भूमी बरोबर या महिलेच्या भूमिकेत तापसी दिसणार आहे. नुकतचं या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं. या चित्रपटाचे पोस्चर तापसीने शेअर करत असे म्हटले की, या दिवाळीत फटाखे नाही गोळ्या चालणार…तर भूमीने हा लूक शेअर करताना लिहीले की, ही भूमिका आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा कठीण परंतु प्रोत्साहन देणाऱ्यांपैकी एक आहे.