घरमनोरंजन'दुर्गामती द मिथ' मध्ये भूमी पेडणेकरचा दमदार लुक

‘दुर्गामती द मिथ’ मध्ये भूमी पेडणेकरचा दमदार लुक

Subscribe

दुर्गामती द मिथ हा सिनेमा साऊथ सिनेमाचा रिमेक

अभिनेत्री भूमी पेडणेकरचा नव्याने येऊ घातलेला सिनेमा ‘दुर्गामती द मिथ’ या सिनेमाचा पहिला लुक रिलीज झाला आहे. अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावरून सिनेमाचा टिझर शेअर केला आहे. ‘दुर्गावती’ असे या सिनेमाचे नाव होते. ते बदलून आता ‘दुर्गामती द मिथ’ असे या सिनेमाचे नाव ठेवण्यात आले आहे. या आधी दुर्गावतीचा पहिला लुक शेअर करण्यात आला होता. सिनेमाचा ट्रेलर उद्या रिलीज होणारआ आहे. त्यानंतर सिनेमाचे नाव बदल्याने पुन्हा एकदा सिनेमाचा नवा लुक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात अभिनेत्री ‘भूमी पेडणेकर’ही एका वेगळ्या लुकमध्ये पहायला मिळत आहे.

- Advertisement -

या सिनेमातून अभिनेत्री भूमी पेडणेकर एका वेगळ्या आणि हटके लुकमध्ये दिसून येत आहे. भूमी पेडणेकरच्या हातात त्रीशुळ दिसत आहे. ती एका दमदार भूमिकेत दिसणार आहे असं सिनेमाच्या पहिल्या लुकमधूनच समोर येत आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर  ११ डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. Amezone prime वर हा सिनेमा पाहता येणार आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या या दमदार लुकमुळे तिच्या चाहत्यांची सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

‘दुर्गामती द मिथ’ हा सिनेमा साऊथ सिनेमाचा रिमेक आहे. ज्यात अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भूमी व्यतिरिक्त सिनेमात अरशद वारसी, जिशु सेनगुप्ता,माही गिल,करण कापाडिया ही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही सिनेमात महत्त्वाची भुमिका साकारणार आहे. ‘भागमती’ तमिळ सिनेमाचा हा रिमेक असणार आहे. सिनेमात हॉरर आणि थ्रिल पहायला मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘झोंबिवली’चे शूट पूर्ण, दिग्दर्शकाने सांगितला शूटिंगचा अनुभव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -