अभिनेत्री भूमी पेडणेकरचे ‘हे’ चित्रपट होणार बॅक टू बॅक प्रदर्शित

मागील काही दिवसात बॉक्स ऑफिसवर काही विशेष चित्रपट दिसले नाही. परंतु, येत्या काही दिवसात भूमीचे लगातार चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Mumbai
भूमी पेडणेकर

दम लगाकर हईशा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भूमी पेडणेकरला या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री पदार्पण हा फिल्म फेअरचा पुरस्कार मिळाला होता. तसेच चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावला होता. सोनचिडीया हा भूमीचा शेवटचा चित्रपट होता. यामध्ये भूमीने दरोडेखोर महिलेची भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर काही विशेष चित्रपट दिसले नाही. परंतु, येत्या काही दिवसात भूमीचे लगातार चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

I am the dragon’s daughter – Daenerys Targaryen 🐉 #Mood . . . #goodmorning #tuesday #gameofthrones #waiting

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar) on

डॉली किट्टी और वो चमकते सितारे

लिपस्टीत अंडर द बुरखा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारी अलंकृता श्रीवास्तव या चित्रपटाचे दिगदर्शन करणार आहे. यामध्ये तिच्यासह कोंकणा सेन देखील दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक मागील ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला होता.

सांड की आंख

अनुराग कश्यपच्या प्रोडक्शन हाऊसद्वारा या चित्रपटाची निर्मिती होत आहे. यामध्ये भूमी पेडणेकर सोबत तापसी पन्नू असणार आहे. चित्रपटाची कथा चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर आधारलेली आहे.

हॉरर फिल्म

भूमी पेडणेकर तापसी पन्नू सोबत हॉरर चित्रपटात देखील दिसणार आहे. हॉरर फिल्म या चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंह हे दिग्दर्शन करणार आहे.

पति पत्नी और वो

हा चित्रपट १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला संजीव कुमार की पति पत्नी और वो या चित्रपटाचा रीमेक असणार आहे. यामध्ये भूमी पेडणेकर शिवाय अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन सोबत दिसणार आहे. मुदस्सर अजीज हे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या वर्षी ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बाला

या चित्रपटात भूमी आयुष्यमान खुराना सोबत तिसरा चित्रपट असणार आहे. यापुर्वी आयुष्यमान सोबत भूमी पेडणेकरने दम लगाके हईशा आणि शुभ मंगल सावधान या चित्रपटात एकत्र काम केले होते.

तख्त

हा चित्रपट करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसचा आहे. हा चित्रपट एक मल्टी स्टारर चित्रपट असणार आहे. ज्यामध्ये भूमीसह जाह्नवी कपूर, अनिल कपूर, करीना कपूर, आलिया भट्ट, विक्की कौशल आणि रणवीर सिंह सारखे कलाकार दिसणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here