Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बिग बींनी केलं KBCला अलविदा

बिग बींनी केलं KBCला अलविदा

'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचा १२ वा सीझन सुरू होता. या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये बिग बींनी ही बातमी सांगितली.

Related Story

- Advertisement -

हिंदीतला सर्वात गाजलेला शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. बिग बी अमिताभ बच्चन हे या कार्यक्राचे सूत्रसंचालन करत करत होते. बिग बींचे सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्ये आहे. मात्र आता कौन बनेगा करोडपतीमध्ये बिग बी सूत्रसंचालन करताना दिसणार नाहीत. गेली २० सुरू असलेल्या या प्रसिद्ध कार्यक्रमाला अमिताभ बच्चन यांनी अलविदा केलं आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा १२ वा सीझन सुरू होता. या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये बिग बींनी ही बातमी सांगितली.

३ जुलै २००० साली KBC हा कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम २० वर्षांत देशातील घराघरांमध्ये पोहचला गेली १४ वर्ष अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. या कार्यक्रमाच्या १२ व्या सीझनच्या शेवटच्या भागात अमिताभ बच्चन यांनी स्वत: मी हा शो सोडत असल्याची घोषणा केली. शूटच्या शेवटच्या दिवशी प्रेक्षकांना निरोप देताना त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सर्व टिम एकत्र येऊन बिग बींना बाय बाय केले. KBC हा कार्यक्रम माझ्यासाठी नेहमीच विशेष राहिल. मला KBC बद्दल नेहमीच ओढ जाणवेल,हा प्रवास माझ्यासाठी कायम अविस्मरणीय असेल असे बिग बी म्हणाले. मी सगळ्यांपुढे दिलगीरी व्यक्तो, पण मी आता थकलो आहे आणि आता मी निवृत्त होत आहे, अशा भावनिक शब्दात अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रमाचा निरोप घेतला.

- Advertisement -

२०२०मध्ये KBC १२ चे शुटींग सुरू झाले होते. कोरोनावर मात करून बिग बी पुन्हा या शुटींगसाठी सज्ज झाले होते. बिग बी सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. आपल्या वयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना सांगत असतात. KBC च्या सेटवरील अनेक प्रसंग बिग बींनी त्यांच्या सोशल मीडियावरून आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात सांगितल्या होत्या.


हेही वाचा – बिग बी ट्रोल, नेटकऱ्यांनी वंशवादावरून सुनावले

- Advertisement -

 

- Advertisement -