…म्हणून अमिताभ यांनी मानले नागपूरकरांचे आभार

अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून नागपुरमध्ये 'झुंड' या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहेत. नुकतेच ट्वीटकरून अमिताभ यांनी नागपूरकरांचे आभार मानले आहेत.

Mumbai
amitabh bachchan
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून नागपुरमध्ये ‘झुंड’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहेत. नुकतेच ट्वीटकरून अमिताभ यांनी नागपूरकरांचे आभार मानले आहेत. हे ट्वीट करताना त्यांनी नागपूरच्या हॉटेलमधील आणि लॉबीमध्ये त्यांना बघायला जमलेल्या गर्दीचे फोटो देखील ट्वीट केले आहेत.

नागपूर विमानतळावरचे फोटो शेअर

नागराज मंजूळे यांच्या पहिल्या वहिल्या हिंदी चित्रपटाचं शुटींग नागपूरमध्ये सध्या सुरू आहे. यात अमिताभ बच्चन मुख्य भुमिकेत आहेत. नागराज यांच्या पहिल्या हिंदी चित्रीपटाची झुंडची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. अमिताभ यांनीच ते नागपूरमध्ये दाखल झाले असल्याचं सोशल मीडियावरून सांगितले होते. नागपूर विमानतळावरचे दोन फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. गेले काही दिवस ते नागपूरमध्येच शूट करत आहेत.

आता, मी नागपूरकरांनी दिलेल्या प्रेमासाठी कायम ऋणी आहे. असं म्हणत त्यांनी नागपूरकरांचे आभार मानले आहेत.

नागपूरमधील मोहननगर भागात शूटींग

झुंडचे शुटींग नागपूरमधील मोहननगर या भागात सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या एका शाळेच्या मागच्या आवारत झुंडचा सेट लागला आहे. अमिताभ या चित्रपटात फुटबॉल कोच विजय बारसे यांच्या जीवनावर आधारीत आहे. नागराज मंजुळे या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर भूषण कुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here