घरमनोरंजनआजवर सहा भाषांमध्ये आलाय ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटीचा शो

आजवर सहा भाषांमध्ये आलाय ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटीचा शो

Subscribe

आपल्या देशात तब्बल सहा भाषांमध्ये आजवर ‘बिग बॉस’ हा रिअ‍ॅलिटी शो छोट्या पडद्यावर होऊन गेला आहे. भारतात हिंदी, कन्नड, तामिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये ‘बिग बॉस’चे शोज दाखवण्यात आले असून आता मराठी आणि सध्या प्रसारित होणारा मल्याळम भाषेतील ‘बिग बॉस’ देखील या यादीत सामील झाला आहे.

सध्या छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस’ मराठीची धूम पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ आपल्या अंतिम टप्प्याकडे आला असून येत्या रविवारी म्हणजेच २२ जुलै रोजी ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या सीजनचा विनर प्रेक्षकांना समजणार आहे. खरेतर आपल्याला हिंदी आणि आता मराठी असे दोनच भाषेतील ‘बिग बॉस’चे शोज माहिती आहेत. पण आपल्या देशात तब्बल सहा भाषांमध्ये आजवर ‘बिग बॉस’ हा रिअ‍ॅलिटी शो छोट्या पडद्यावर होऊन गेला आहे. तर काही भाषांमध्ये या शोजचे सीजन सुरू देखील आहे. भारतात हिंदी, कन्नड, तामिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये ‘बिग बॉस’चे शोज दाखवण्यात आले असून आता मराठी आणि सध्या प्रसारित होणारा मल्याळम भाषेतील ‘बिग बॉस’ देखील या यादीत सामील झाला आहे. त्यामुळे आजवर सहा भाषांमध्ये बिग बॉस शो दाखवण्यात आला आहे.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याने हिंदी ‘बिग बॉस’ने होस्टींग केले असून अद्याप याचे ११ सीजन झाले आहेत. सुरुवातीला अभिनेता अर्शद वारसी याने पहिल्या शोचे होस्टींग केल्यावर नंतर परदेशातील बिग ब्रदरची विनर बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने दुसर्‍या सीजनचे सूत्रसंचालन केले. त्यानंतर सर्व सीजन हे सलमान खान याने होस्ट केले आहे. तर कन्नडमध्ये ‘बिग बॉस’चे ५ सीजन झाले असून त्याचे सूत्रसंचालन दाक्षिणात्य अभिनेता सुदिप यांनी केले आहे. ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी तामिळ भाषेतील ‘बिग बॉस’चा शो होस्ट केला असून तेलुगू भाषेतील या शोचे सूत्रसंचालन अभिनेता ज्युनिअर एनटीआर यांनी केले आहे. तर मराठी ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर करत आहेत.

- Advertisement -

मराठी ‘बिग बॉस’सोबतच मल्याळम भाषेतही जून २०१८ मध्ये मल्याळम भाषेतील ‘बिग बॉस’चा सीजन सुरू झाला असून याचे सूत्रसंचालन अभिनेता मोहनलाल करत आहेत. हा देखील १६ सेलिब्रिटींसोबत सुरू करण्यात आलेला सीजन असून १०० दिवस हे कलाकार ‘बिग बॉस’च्या घरामध्ये राहणार आहेत. त्यामुळे या शोचा फिनाले सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. एकामागोमाग होणार्‍या ‘बिग बॉस’च्या विविध भाषेतील सीजनने संपूर्ण वर्ष भरून जात आहे. पुन्हा दिवाळीच्या दरम्यान सलमान खानच्या हिंदी ‘बिग बॉस’च्या १२ व्या सीजनची घोषणा केली जाईल. त्यानंतर प्रेक्षक हिंदीतील ‘बिग बॉस’चा थरार अनुभवायला सज्ज होतील. त्यामुळे तुर्तास प्रेक्षक हे मराठी ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीजनच्या विजेत्याची वाट पाहत असून या शेवटच्या आठवड्याची मज्जा घेत आहेत.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -