Bigg Boss Marathi 2: KVR ग्रुपमधील मतभेद संपता संपेना !

Mumbai

बिग बॉस मराठीच्या घरामधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या KVR ग्रुपमधील भांडण संपता संपत नाहीयेत. एक मुद्दा झाला कि दुसरा मुद्दा, तो संपत नाही तर तिसरा मुद्दा डोक वर काढतो. त्यामुळे घरातील इतर सदस्य आणि प्रेक्षकांना वीणा, रुपाली आणि किशोरीताई या तिघींच्या मनामध्ये नक्की काय आहे हेच कळत नाहीये. काय गैरसमज आहेत ? कोणत्या कारणावरून त्या एकमेकींवर नाराज आहेत ? याबद्दल प्रश्नचिन्हच आहे. कधी वीणाचं रुपालीसोबत भांडण होत तर कधी किशोरीताई सोबत. कधी रुपाली वीणावर नाराज होते तर कधी किशोरीताई वर कधी किशोरीताई वीणा आणि रुपालीमधील गैरसमज दूर करतात तर कधी रुपाली किशोरी आणि वीणामधीलआणि यामध्येच आठवडे संपत आहेत.

आज देखील या तिघींमध्ये होणाऱ्या चर्चेचा विषय तोच आहे. रूपालीचे म्हणणे आहे, आज जे मी गाण म्हंटल ते म्हणूनच होत कि, अजूनही मला कुठेतरी वाटत आहे कि आपण तिघी एकत्र आहोत, तू ऐकल नाहीस का ते त्यावर किशोरीताईचे म्हणणे होते मला डबल डबल वागायला जमत नाही, मी एकमार्गीच वागते. कधी एक बोलायचं कधी दुसर बोलायच यामध्ये मला नाही अडकायचे आहे. त्यावर वीणा म्हणाली असे कोणीच करत नाही. रुपाली बोलताना म्हणाली, पंचिंग बॅग वाला जो टास्क होता त्यावर तुझा फोटो लावण्याचे कारण होते मला तुझ्याशी बोलताच येत नाही, तुला सांगता येत नाही काही, तुला समजवता येत नाही. त्यावर किशोरीताई म्हणाल्या, मी नेहेमीच गप्प असते तुम्ही दोघीच बोलत असता रुपाली म्हणाली हे तू सगळ्यांनाच सांगितले आहे. त्यावर त्या म्हणाल्या मला सांगायची गरज नाही…शिवला तू म्हणालीस स्वत:च्या डोक्याने नाही खेळत, तुम्ही दोघी माझ्यामागे बोलता.त्यावर दोघींचे म्हणणे होते मागे नाही समोर बोलो आम्ही… आणि आरोप प्रत्यारोप सुरूच राहिले… मला यावर नाही बोलायचे असे बोलून किशोरीताई तिथून उठून गेल्या.

आता हे असं किती दिवस सुरू राहणार? के व्ही आर ग्रुप पुन्हा होणार की नाही? हे येणारा काळच ठरवेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here