बिग बॉस रॅप साँगचा खरा ‘रॅपर’

mumbai

बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन कधी एकदा सुरू होतोय असं प्रेक्षकांना झालं आहे. बिग बॉसने स्पर्धकांच्या नावाची कोडी सोडवताना प्रेक्षकांच्या डोक्याला झिणझिण्या आल्या आहेत. त्यातच एक बिग बॉसच रॅपचिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्या रॅपचिक लूकचीच चर्चा सध्या रंगली आहे.महेश मांजरेकरांनी अतिशय धम्माल करत हे रॅपचिक साँग शूट केले आहे. विशेष म्हणजे महेश मांजरेकरांनी हे गाणं स्वत: गायले आहे. त्यांचा एक वेगळा अंदाज यात दिसत आहे. हे रॅप साँग सचिन पाठक (यो) याने लिहीलं आहे. या आधी सचिनने ‘गॅटमॅट’,’लकी’ सारख्या अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहीली आहेत. तर हिंदी चित्रपटसृष्टीसाठी देखील सचिनने गीत लेखन केले आहे. त्याने लिहीलेलं सिंघम रिटर्नमधील ‘आता माझी सटकली’ हे गाणं विशेष गाजलं होतं.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागाच्या प्रोमोसाठी महेश मांजरेकरांनी चार वेगवेगळ्या लुकमध्ये शूटींग केले आहे. त्यातला रॅप लूक विशेष प्रेक्षकांना आवडला आहे. या गाण्याच्या चित्रिकरणासाठी सहा वेगळ्या प्रकारचे सेट तयार करण्यात आले आहेत. महेश मांजरेकर या गाण्यामध्ये चार वेगवेगळ्या डॅपर लुक्समध्ये दिसत आहेत.

बिग बॉस मराठी २ साठी रॅप साँग लिहीण्याचा अनुभव खूप छान होता. महेश मांजरेकरच हे रॅप साँग गाणार म्हटल्यावर त्यांना हे रॅप साँग आवडणं गरजेच होतं. माझं नशीब खूप चांगलं आहे. मी लिहीलेल्या या पहिल्याच गाण्याला महेश सर आणि कलर्स मराठीने होकार दिला. अगदी दोन दिवसात हे साँग लिहीलं. हे रॅप साँग लिहायला खूप सोप्प गेलं. कारण गेल्या बिग बॉसने खूप ‘कटेंट’ मला दिला. त्यामुळे लिहीण खूप सोप्प केलं. भांडण, राग, प्रेम हे सगळं या रॅप साँगमध्ये आहे. हे गाणं शूट करतानाही खूप धम्माल आली. प्रेक्षकांना हे रॅप साँग नक्की आवडेल.
– सचिन पाठक, गीतकार