म्हणून बिग बॉस मराठीचं घर नसणार लोणावळ्यात

बिग बॉस मराठीचा सेट यावर्षी लोणावळ्यात उभारणार नाहीये. बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन साठी घर मुंबईतच असणार आहे.

Mumbai
big boss marathi house
बिग बॉस मराठी

मनोरंजनाचा तिसरा डोळा आता पुन्हा एकदा उघडणार आहे. गेल्या वर्षीपासून मराठी बिग बॉसला सुरूवात झाली. पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. वाद,प्रेम, भांडणं,तंटे अशा गोष्टींनी खच्चाखच भरलेला हा पहिला सिझन होता. बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्ये मराठी बिग बॉसचा बंगलाही लक्षवेधी ठरला. मात्र आता नवीन येणाऱ्या सिझनमध्ये तो बंगला आता लोणावळ्यामध्ये नसणार आहे.

हिंदी बिग बॉस प्रमाणेच मराठी बिग बॉसचा सेट देखील लोणावळ्यात उभा करण्यात आला होता. मात्र आता बिग बॉस मराठी सिझन २ चा सेट मुंबई येथील गोरेगाव फिल्म सीटीमध्ये उभारण्यात आला आहे. याआधी मल्याळम बिग बॉसचे शुटिंग गोरेगाव फिल्म सीटीमध्ये करण्यात आले होते. कलाकार आणि शो सेटच्या दृष्टिने मुंबई येथील गोरेगाव सोयीस्कर असल्याने शो निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.

हिंदी बिग बॉसप्रमाणे मराठी बिग बॉसचा स्वतंत्र चाहतावर्ग तयार झाला. मराठी बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन येणार आहे. या सिझनचा पहिला प्रमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

मराठी बिग बॉसच्या अंतीम फेरीत मेघा धाडे,पुष्कर जोग,सई लोकूर,अस्ताद काळे,स्मिता गोंदकर आणि शर्मिष्ठा राऊत यांनी धडक मारली होती. मेघाचं भांडण असो किंवा सई-पुष्करचं हेल्दी फ्लर्टिंग असो प्रेक्षकांना या सिझनने भरपून मनोरंजन केलं. या पर्वात पहिल्या सिझनची विजेती मेघा धाडेवर अनेक अरोप झाले. तिच्या जवळचे ही नंतर तिच्या विरोधात गेलेल बघायल मिळाले. यावेळी घरात अनेक भांडणही झाली. अखेर मेघाने या सिझनमध्ये बाजी मारली. तर सगळ्यांचा लाडका पुष्कर जोग पहिला सिझनचा उपविजेता ठरला. आता नवीन येणाऱ्या सीझनमध्ये कोण कोण मराठी कलाकार असणार? पुन्हा एकदा महेश मांजरेकर या कार्यक्रमाची धूरा सांभाळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना कळतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here