घरमनोरंजनउर्मिला मातोंडकरसह थिरकले जावेद अख्तर

उर्मिला मातोंडकरसह थिरकले जावेद अख्तर

Subscribe

वयाच्या ७३ व्या वर्षी जावेद अख्तर यांनी केलेल्या डान्सचं नेटिझन्सकडून भरभरुन कौतुक होत आहे.

जगभरात सध्या चर्चा आहे ती ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या ‘बिग फॅट वेडिंग’ची. उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानींची कन्या ईशा अबांनी लवकरच पिरामल घराण्याची सून होणार आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये नुकताच ईशाचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूडमधील तमाम सेलिब्रीटीजनी हजेरी लावली होती. शाहरुख, सलमान आणि आमिर या तिनही खानसोबत बॉलीवूडच्या अनेक तारे-तारकांनी ईशा अंबानीच्या संगीत सोहळ्याला चारचांद लावले. ज्येष्ठ गायक आणि संगीतकार जावेद अख्तरही यावेळी गाण्यावर धमाल डान्स करताना दिसले. जावेद अख्तर त्यांची पत्नी शबाना आझमी यांच्यासोबत ईशाच्या लग्नसोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. जावेद यांच्यासह शबाना आझमीही यावेळी ताल धरताना दिसल्या. जावेद आणि शबाना यांनी ‘शोला जो भडके.. दिल मेरा धडके’ या एव्हरग्रीन गाण्यावर डान्स केला. त्यांच्या या डान्सचे काही व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वयाच्या ७३ व्या वर्षी जावेद अख्तर यांनी केलेल्या डान्सचं नेटिझन्सकडून भरभरुन कौतुक होत आहे. तुम्हीही पाहा, या धमाल डान्सची एक झलक…

- Advertisement -

पाहा : ईशाच्या लग्नाला थिरकली ‘बियॉन्से’

 

 

View this post on Instagram

 

#JavedAkhtar rocks

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

- Advertisement -

मुंबईत घेणार ‘शाही फेरे’

ईशा अंबनी आणि आनंद पिरामल यांचे प्री-वेडिंग सोहळे सध्या जयपूरच्या एका रॉयल पॅलेसमध्ये संपन्न होत आहेत. मात्र, असं असलं तरी हे जोडपं लग्नाचे सात फेरे मात्र मुंबईमध्ये घेणार आहेत. उपलब्ध महितीनुसार, अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया हाऊसमध्ये आनंद आणि ईशा त्यांची लग्नगाठ बांधतील. आता देशातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मुलीचं लग्न म्हटलं, की ते त्या तोडीचं आणि तितकंच रॉयल असणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे प्रत्यक्षात आनंद-ईशाचा लग्नसोहळा आता कसा रंगणार हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

 

View this post on Instagram

 

#UrmilaaMatondkar, #JavedAkhtar, #ShabanaAzmi and #JavedJaffrey are making us want to dance with them to the Golden era’s music.

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -