घरमनोरंजनफाइव्ह स्टार हॉटेलपेक्षा सुंदर आहे,बिग बॉसच्या १२व्या सिझनचं घरं!

फाइव्ह स्टार हॉटेलपेक्षा सुंदर आहे,बिग बॉसच्या १२व्या सिझनचं घरं!

Subscribe

बिग बॉसच्या १२ व्या सिझनची उत्सुकता बिग बॉसच्या चाहत्यांना आहे. या सिझनमध्ये कोणते कलाकार घरात असणार या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच बिग बॉसच्या सुंदर घराची झलक चाहत्यांसमोर आली आहे.

आजपासून बिग बॉसच्या १२ व्या सीझनची सुरूवात होत आहे. बिग बॉसमधील सदस्यांप्रमाणेच बिग बॉसचं सुंदर घर हा कायमच चर्चेचा विषय राहीला आहे. बिग बॉसच्या गेल्या ११ सीझनची घरं ही अतिशय सुंदर होती. त्याचप्रमाणे या १२ व्या सीझनचं घरं हे अतिशय देखणं आहे. त्यामुळे या पर्वातील सदस्यांबरोबर त्या घराची चर्चा नाही झाली तरच नवलं. बिग बॉसच्या घराचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो बघून नक्कीच तुम्ही बिग बॉसच्या घराच्या प्रेमात पडाल.

घर बघितल्यावर तुम्हाला समजेल की बिग बॉस १२ चा लॉचिंग सोहळा हा गोव्यात का पार पडला. कारण बिग बॉसच्या घराचे इंटेरियर समुद्र आणि समुद्र किनाऱ्याशी निगडीत आहे. हे सुंदर प्रशस्त घराचे डिझाईन बॉलिवूड डिझायनर ओमंग कुमार यांनी केलं आहे. बिग बॉसच्या घरात शिरल्यावर अगदी अंगणापासून ते किचन, लिव्हींगरूमध्ये गेल्यावर तुम्हाला समुद्रात असल्यासारखा भास होईल. अशा पध्दतीने हा संपूर्ण परिसर सजवण्यात आला आहे.

- Advertisement -

बिग बॉसचे आजपर्यंतचे सगळे सीझन हिट ठरले आहेत. बिग बॉसच्या ११ व्या सिझनमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदे विजेती झाली होती. मात्र या सीझनमध्ये काही रिअल लाईफ जोड्याही घरात बघायला मिळणार आहेत. बिग बॉस चाहत्यांना बिग बॉसच्या स्पर्धकांची मजा, टास्क पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

ही नावं चर्चेत

नेहा पेंडसे, मिलींद सोमण, अंकिता कुंवर, विभा छिब्बर, सृष्टी रोडे, देवोलिना भट्टाचार्य, रिध्दिमा पंडित, दिव्या अगरवाल, स्कारलेट मीरोज, शुभी जोशी, शालीन भनोट, महिका शर्मा, एस परिछा, गुरमीत देबिना, शोएब-दीपिका, डेनी डी, परम सिंह,श्रीसंत हे स्पर्धक म्हणून दिसणार आहे.

- Advertisement -

सलमानच्या फीची चर्चा रंगली 

‘बिग बॉस’ हा हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वाधीक लोकप्रीय रिअॅलिटी शो असून त्याला टीआरपी देखील चांगली असते. प्रामुख्याने शनिवार आणि रविवारी सलमाना खान घरातील सेलिब्रिटींची शाळा घेण्याकरता येतो. साधारण १३ आठवडे चालणारा हा शो असून यंदाच्या संपूर्ण शो करता सलमान ३६४ कोटी रुपये फी आकारणार असल्याचे समजते. सुपरस्टार सलमान खान ‘बिग बॉस’च्या एका एपिसोडसाठी तब्बल १४ कोटी रुपये आकारत असून ही सर्वाधीक रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. या रकमेसोबतच सलमान खान हायेस्ट पेअर कलाकार झाला आहे. गेल्या वर्षीच्या सीजनमध्ये सलमानने याच शोकरता ११ कोटी रूपये घेतले होते. तर यंदाच्या शोसाठी त्याने एका एपिसोडकरता १९ कोटीची मागणी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -